हो, आम्ही बनणार आई-बाबा - सैफ अली खान

By Admin | Updated: July 2, 2016 14:10 IST2016-07-02T13:05:18+5:302016-07-02T14:10:48+5:30

अभिनेत्री करीना कपूर प्रेग्नंट असून तिचा पती व अभिनेता सैफअली खानने ही गुड न्यूज शेअर केली आहे.

Yes, we are going to be my parents - Saif Ali Khan | हो, आम्ही बनणार आई-बाबा - सैफ अली खान

हो, आम्ही बनणार आई-बाबा - सैफ अली खान

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - बॉलिवूडमध्ये 'बेबो' नावाने प्रसिद्ध असलेली करीना कपूर-खान सध्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. करीनाकडे गुड न्यूज असल्याची चर्चा सगळीकडे सुरू असताना तिने मात्र या विषयावर अद्याप मौन सोडलेले नाही. मात्र ही बातमी आता कन्फर्म झाली असून करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खानने आपण 'बाबा' बनणार असल्याची गुड न्यूज शेअर केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात आम्हाला बाळ होणार असल्याचे सांगत सैफने मीडियासोबत शेअर केली आहे. चाहत्यांच्या आशिर्वादासाठी आम्ही आभारी आहोत तसेच मीडियाने आमच्या खासगी आयुष्यात छवळाढवळ न करता पेशन्स दाखवल्याबद्दलही आम्ही आभारी आहोतअसेही सैफने म्हटले आहे. 
करीनाच्या प्रेग्नन्सीची चर्चा ब-याच काळापासून सुरू होती. करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर यांनी देखील मला लवकरच आजोबा बनायचं आहे असे विधान केले होते. या सगळ्यामुळे करिना-सैफच्या घरात लवकरच पाळणा हलणार असणार असल्याचे म्हटले जात होते.  आज ही खूशखबर खुद्द सैफनंच दिल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

Web Title: Yes, we are going to be my parents - Saif Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.