यामीचा सेक्सी अंदाज
By Admin | Updated: September 14, 2015 03:21 IST2015-09-14T03:21:11+5:302015-09-14T03:21:11+5:30
ब्युटी क्रीमच्या जाहिरातीमुळे प्रसिद्ध झालेली यामी गौतमीच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. ‘विकी डोनर’द्वारे फिल्म करिअर सुरू करणारी यामी आतापर्यंत कधीही न केलेली गोष्ट करताना दिसणार आहे

यामीचा सेक्सी अंदाज
ब्युटी क्रीमच्या जाहिरातीमुळे प्रसिद्ध झालेली यामी गौतमीच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. ‘विकी डोनर’द्वारे फिल्म करिअर सुरू करणारी यामी आतापर्यंत कधीही न केलेली गोष्ट करताना दिसणार आहे. आगामी ‘जुनूनियत’ चित्रपटात ती एक तडकेबाज आयटम साँग करणार आहे. यामी म्हणते की स्टाईलिश बॉलीवूड आयटम नंबर करणे माझे स्वप्न होते. पण आतापर्यंत कधीच अशी संधी मिळाली नव्हती. त्यामुळे मी आता आनंदी आहे. हिंदी चित्रपटाच्या यशामध्ये डान्स नंबरचा मोठा हात असतो. काही हीरोईन तर केवळ एका आयटम साँगच्या बळावर बॉलीवूडमध्ये स्थान टिक वून आहेत. म्हणून कॅटरिना, करिना आणि मलाईका अरोराच्या पंक्तीत सामील होण्यास ती सज्ज झाली आहे. हा एक रोमँटिक सिनेमा असून, यामीच्या सोबतीला यामध्ये पुलकित सम्राट आहे.