पूजाचा रेड कार्पेटवर जलवा

By Admin | Updated: July 15, 2016 00:53 IST2016-07-15T00:53:08+5:302016-07-15T00:53:08+5:30

जगभरातील ताऱ्यांच्या झगमगाटात रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळणे म्हणजे त्या कलाकारासाठी खरेच स्वप्नपूर्ती झाल्यासारखेच असते.

Worship at Pooja's red carpet | पूजाचा रेड कार्पेटवर जलवा

पूजाचा रेड कार्पेटवर जलवा

जगभरातील ताऱ्यांच्या झगमगाटात रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळणे म्हणजे त्या कलाकारासाठी खरेच स्वप्नपूर्ती झाल्यासारखेच असते. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरून चालायचे म्हणजे जगभरातील लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधणार. आता अशीच संधी मिळाली होती, आपल्या ब्युटिफुल पूजा सावंतला. पूजाला नुकतेच माद्रिद फिल्म फेस्टिव्हलकडून तिच्या ‘लपाछपी’ या चित्रपटासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ही बातमीच पूजासाठी खूप आनंदाची होती. आपला चित्रपट आज जागतिक स्तरापर्यंत पोहोचला असल्याने तिचा आनंद द्विगुणित झाला होता. या अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटवरील काही फोटोज् पूजाने सर्वप्रथम सीएनएक्ससोबतच शेअर केले अन् तिच्या या एक्सपिरिअन्सबद्दल सीएनएक्सला खास मुलाखतदेखील दिली. पूजा म्हणाली, ‘‘लपाछपी’ या चित्रपटासाठी जेव्हा माझे नॉमिनेशन जगभरातील अ‍ॅक्ट्रेससोबत झाले, तेव्हा खूपच मस्त वाटले. माझी व्हिडीओ क्लिप सर्व इंटरनॅशनल स्टार्सबरोबर जेव्हा दाखविण्यात आली, तो क्षणच माझ्यासाठी अविस्मरणीय होता. ब्लॅक कलरचा एम्ब्रॉयडरी टॉप अन् गोल्डन कलरचे नक्षीकाम असलेला आॅफ-व्हाइट लेहेंगा असा इंडो-वेस्टर्न कॉस्च्युम पूजाने या रेड कार्पेटसाठी परिधान केला होता. या ड्रेसची स्टाईल श्रद्धा ओझा अन् गाऊन प्रीती डिझाईन हट यांचे आहेत. या संपूर्ण लूकमध्येच पूजा अतिशय सुंदर दिसत होती अन् रेड कार्पेटवर मराठमोळा जलवादेखील दाखवित होती.

Web Title: Worship at Pooja's red carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.