साक्षी-एकता लवकरच एकत्र!
By Admin | Updated: June 12, 2016 01:27 IST2016-06-12T01:27:57+5:302016-06-12T01:27:57+5:30
साक्षी तन्वरने एकता कपूरसोबत ‘कहानी घर घर की’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या सुपरिहट मालिका दिल्या आहेत. या दोघी आता पुन्हा एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे.

साक्षी-एकता लवकरच एकत्र!
साक्षी तन्वरने एकता कपूरसोबत ‘कहानी घर घर की’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या सुपरिहट मालिका दिल्या आहेत. या दोघी आता पुन्हा एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘कवच...काली शक्तियो से’ या मालिकेत साक्षी तन्वर अथवा मोना सिंग प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. या मालिकेत आता मोना सिंग प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेनंतर एकता एका नव्या मालिकेवर काम करायला सुरुवात करणार असून, या मालिकेत साक्षी तन्वर प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. साक्षी आणि एकता यांच्या जोडीने नेहमीच हिट मालिका दिल्या असल्याने, प्रेक्षकांना त्यांच्या मालिकेची उत्सुकता लागलेली आहे.