एक हजार कोटींचा चित्रपट बनवणार - राजमौली
By Admin | Updated: October 25, 2015 10:47 IST2015-10-25T09:52:14+5:302015-10-25T10:47:33+5:30
दिग्दर्शक एस एस राजमौली बाहुबली चित्रपटाला मोठे यश मिळाल्यानंतर नव्या चित्रपटाच्या तयारीत असून त्यांची देशातील सर्वात महागडा चित्रपट बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.

एक हजार कोटींचा चित्रपट बनवणार - राजमौली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२५ - दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्या बाहुबली चित्रपटाला मोठे यश मिळाल्यानंतर नव्या चित्रपटाच्या तयारीत असून त्यांची देशातील सर्वात महागडा चित्रपट बनवण्याची तयारी सुरु झाली असून गरुणा असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असेल. बाहुबलीच्या सिक्वेलचे सध्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटींग सुरु असून ते संपताच गरुणाचे शूट सुरु होईल.
एक हजार कोटीहून अधिक एस एस राजमौली यांच्या गरुणा या नव्या चित्रपटाचा खर्च असणार असल्याचे सूत्रांकडून समजते. नियोजीत वेळेत चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले तर हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित होऊ शकेल. या चित्रपटात दक्षिणेतील सुपरस्टार मोहनलाल आणि ज्युनियर एनटीआर यांच्या भूमिका असू शकतील असा सूत्रांचा अंदाज आहे.
महाभारत कालीन चित्रपटाचा विषय असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी तयार झालेल्या ह्यबाहुबलीह्ण चित्रपटासाठी २५० कोटी रुपये खर्च झाला होता. आता या चित्रपटाचा खर्च बाहुबलीपेक्षा चौपट असणार आहे. बाहुबलीने ६०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.