उर्फीतील डायलॉगही होणार का फेमस ?
By Admin | Updated: November 14, 2015 02:28 IST2015-11-14T02:28:51+5:302015-11-14T02:28:51+5:30
प्रथमेश परबने साकारलेल्या ‘टाइमपास’ चित्रपटातील अनेक डायलॉग प्रसिद्ध झाले होते. आई-बाबा आणि साईबाबांची शप्पथ, आम्ही गरीब

उर्फीतील डायलॉगही होणार का फेमस ?
प्रथमेश परबने साकारलेल्या ‘टाइमपास’ चित्रपटातील अनेक डायलॉग प्रसिद्ध झाले होते. आई-बाबा आणि साईबाबांची शप्पथ, आम्ही गरीब असलो म्हणूनी काय जाहले, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार... चला हवा येऊ द्या, नया हैं वह, शाकाल हे आणि असे अनेक डायलॉग प्रसिद्ध झाले होते. आता प्रथमेश आणि मिताली मयेकर ही नवी जोडी ‘उर्फी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील ‘माशाचं पाण्यावर, सिंगरचं गाण्यावर आणि कंजुशीचं जसं वाण्यावर प्रेम असतं ना तसं प्रेम होतं आपलं तुझ्यावर आहे,’ हा डायलॉगही तितकीच पसंती मिळवणार का, याबद्दल उत्सुकता आहे.