का आली सलमानवर एकच टी-शर्ट वापरण्याची वेळ?

By Admin | Updated: July 20, 2016 10:50 IST2016-07-20T10:50:03+5:302016-07-20T10:50:03+5:30

सध्या सलमान अनेक ठिकाणी एकाच टी-शर्टमध्ये वावरताना दिसत आहे, सलमानला पाहिल्यावर का आली सलमानवर एकच टी-शर्ट वापरण्याची वेळ? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण होईल

Why is Salman to use only one T-shirt? | का आली सलमानवर एकच टी-शर्ट वापरण्याची वेळ?

का आली सलमानवर एकच टी-शर्ट वापरण्याची वेळ?

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 20 - सलमानला पाहिल्यावर का आली सलमानवर एकच टी-शर्ट वापरण्याची वेळ? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण होईल. कारण सध्या सलमान अनेक ठिकाणी एकाच टी-शर्टमध्ये वावरताना दिसत आहे.
 
सलमान हा फॅशन आयकॉन मानला जातो. त्याने केलेली फॅशन त्याचे चाहते लगेचच फॉलो करतात. पण सध्या सलमानला पाहता तो फॅशन आयकॉन असल्याचा त्याला विसर पडला आहे का असा विचार करावा लागत आहे. सलमानने सुलतान या चित्रपटासाठी अनेक किलो वजन वाढवले होते. तो काही दिवसांत हे वजन कमी करणार असल्याचे म्हटले जात होते. पण काही केल्या त्याचे वजन कमी होत नाहीये असेच त्याला पाहून म्हणावे लागेल. वजन वाढल्यामुळे कपडे काय घालायचे हा प्रश्न जसा सामान्यांना सतावतो, तसाच त्यालाही सतावत आहे का ? असे त्याला पाहून आता वाटायला लागले आहे. कारण सध्या तो अनेक ठिकाणी एकच टी-शर्ट घालून जात असल्याचे दिसत आहे.
 
सलमानने मेहबूब स्टुडिओमध्ये सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पत्रकारांना मुलाखती दिल्या होत्या, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा या टी-शर्टमध्ये त्याला पाहायला मिळाले होते.
सलमान चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी झळकला होता. या कार्यक्रमात त्याने खूप धमाल मस्तीही केली होती. या कार्यक्रमातही त्याने याच टी-शर्टमध्ये उपस्थिती लावली होती. 
काल विमानतळावर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्यामुळे तो दिवसभर चर्चेत होता. रात्रीच्या वेळात त्याला पुन्हा आंतराराष्ट्रीय विमानतळावर पाहाण्यात आले. त्यावेळीही सलमानने हाच टी-शर्ट घातला होता.
 

Web Title: Why is Salman to use only one T-shirt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.