का आली सलमानवर एकच ‘टी-शर्ट’ वापरण्याची वेळ ?
By Admin | Updated: July 20, 2016 23:39 IST2016-07-20T23:39:03+5:302016-07-20T23:39:03+5:30
या फोटोमध्ये सलमान खानला पाहिल्यावर, सलमानवर एकच टी-शर्ट वापरण्याची वेळ का आली?

का आली सलमानवर एकच ‘टी-शर्ट’ वापरण्याची वेळ ?
या फोटोमध्ये सलमान खानला पाहिल्यावर, सलमानवर एकच टी-शर्ट वापरण्याची वेळ का आली? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण होईल. कारण सध्या सलमान अनेक ठिकाणी एकाच टी-शर्टमध्ये वावरताना दिसतो आहे. सलमान हा फॅशन आयकॉन मानला जातो. त्याने केलेली फॅशन त्याचे चाहते लगेचच फॉलो करतात. पण सध्या सलमानला पाहाता तो फॅशन आयकॉन असल्याचा त्याला विसर पडला आहे का असेच दिसते. सलमानने सुलतान या चित्रपटासाठी अनेक किलो वजन वाढवले होते. तो काही दिवसांत वाढलेले वजन कमी करणार असल्याचे म्हटले जात होते. पण काही केल्या त्याचे वजन कमी होत नाहीये असेच त्याला पाहून म्हणावे लागेल. वजन वाढल्यामुळे कपडे काय घालायचे हा प्रश्न जसा सामान्यांना सतावतो, तसाच त्यालाही सतावत आहे का असे त्याला पाहून आता वाटायला लागले आहे. कारण सध्या तो अनेक ठिकाणी एकच टी-शर्ट घालून जात असल्याचे दिसत आहे.सलमानने मेहबूब स्टुडिओमध्ये सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पत्रकारांना मुलाखती दिल्या होत्या, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा या टी-शर्टमध्ये तो दिसला होता. यानंतर सलमान ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात खूप धमाल-मस्ती केली. मात्र, या कार्यक्रमातही तो ‘सेम’ टी-शर्टमध्ये होता. मंगळवारी मुंबई विमानतळावर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्यामुळे तो दिवसभर चर्चेत होता. रात्रीच्या वेळात त्याला पुन्हा आंतराराष्ट्रीय विमानतळावर पाहाण्यात आले.
त्यावेळीही सलमानने तेच टी-शर्ट घातले होते.