लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'सोढी'ने 'तारक मेहता..चष्मा' मालिका का सोडली? भावूक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 05:31 PM2024-04-27T17:31:56+5:302024-04-27T17:33:31+5:30

सध्या तारक मेहता..चष्मा मधील सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता आहे. त्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ही मालिका का सोडली याविषयी माहिती समोर आलीय

Why did Gurucharan singh leave Tarak Mehta ka ooltah Chashma serial | लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'सोढी'ने 'तारक मेहता..चष्मा' मालिका का सोडली? भावूक कारण समोर

लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'सोढी'ने 'तारक मेहता..चष्मा' मालिका का सोडली? भावूक कारण समोर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  गेल्या ४ दिवसांपासून गुरूचरणचा काहीच पत्ता नसल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. गुरूचरण दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाला होता. मात्र तो मुंबईत पोहचलाच नाही. गेल्या २ दिवसांपासून त्याचा फोनही बंद असल्याचं समोर आलं आहे. 'तारक मेहता..चष्मा' मध्ये गुरुचरण यांनी साकारलेली सोढीची भूमिका चांगलीच गाजली. पण लोकप्रियतेच्या शिखरावर असताना गुरुचरण यांनी  'तारक मेहता..चष्मा'  मालिका का सोडली हे कारण वाचून तुम्हाला त्यांचं कौतुक वाटेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुचरण सिंह यांनी तारक मेहता..चष्मा मालिका का सोडली याविषयी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते. ते म्हणाले होते की त्यांच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना या मालिकेचा निरोप घ्यावा लागला.  'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा त्यांच्यासाठी मोठा शो आहे. लोकं त्यांना खऱ्या नावापेक्षा शोमधील एक सोढी म्हणून अधिक ओळखतात. याची त्यांना जाणीव होती. परंतु ते म्हणाले होते की, "मी सध्या स्वतःच्या शोधात आहे आणि माझ्या आई-वडिलांसाठी काहीतरी करायचं आहे, म्हणून मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता."

दरम्यान गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर CCTV फुटेजही समोर आले. दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी रोहित मीना म्हणाले," गुरुचरण सिंग यांच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली आहे. २२ एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता ते मुंबईसाठी निघाल्याचं त्यांनी नमूद केलं.  आम्ही केस रजिस्टर केली आहे आणि सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास केला आहे. आम्ही फुटेज आणि टेक्निकल तपास केला. त्यातून काही महत्वाचे क्लू मिळाले आहेत. कलम 365 अंतर्गत केस दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीतून गुरुचरण यांची हालचाल CCTV मधून पाहिली आणि यातून पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न केले. सोबत एक बॅगपॅक घेऊन ते जाताना दिसले."

Web Title: Why did Gurucharan singh leave Tarak Mehta ka ooltah Chashma serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.