रणबीर-कॅटमुळे कोण वैतागले?

By Admin | Updated: June 6, 2016 01:12 IST2016-06-06T01:12:18+5:302016-06-06T01:12:18+5:30

जग्गा जासूस सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग बासू सध्या भलतेच वैतागलेत. त्यांच्या या वैतागाला कारणीभूत ठरलेत ते बॉलिवूडचे एक्स लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ. या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचा परिणाम

Who stops Ranbir-Kat? | रणबीर-कॅटमुळे कोण वैतागले?

रणबीर-कॅटमुळे कोण वैतागले?

जग्गा जासूस सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग बासू सध्या भलतेच वैतागलेत. त्यांच्या या वैतागाला कारणीभूत ठरलेत ते बॉलिवूडचे एक्स लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ. या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचा परिणाम त्यांच्या कामावर जाणवू लागलाय. त्यामुळं जग्गा जासूस सिनेमाचं शेड्युलही अनेकदा बदलावं लागलंय. सिनेमा लांबत चालला असल्यानं त्याचं बजेटही वाढतंय. नुकतंच मोरक्कोमध्ये या सिनेमाचं शूटिंग पार पडलं. यावेळीसुद्धा रणबीर आणि कॅटच्या ब्रेकअपमुळं अनेकदा सीन घेताना अनुरागची दमछाक झाली. या सिनेमाचं उर्वरित शूटिंगसुद्धा मोरक्कोमध्येच होणार होतं. मात्र आता अनुरागनं हा प्लान बदललाय. अनुरागनं मोरक्कोला जाण्याऐवजी आता मुंबईमध्येच मोरोक्कोचा सेट उभारायचं ठरवलंय. त्यामुळं बजेट वाचवण्याचा अनुरागचा हा फंडा चांगलाच म्हणावा लागेल.

Web Title: Who stops Ranbir-Kat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.