'अजूनही बरसात आहे' मालिकेतील मनू आलीय चर्चेत, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 07:00 IST2021-07-29T07:00:00+5:302021-07-29T07:00:00+5:30

अजूनही बरसात आहे या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Who is the actress who plays the role of Manu, Meera's sister in 'Ajunahi Barsaat Aahe'? | 'अजूनही बरसात आहे' मालिकेतील मनू आलीय चर्चेत, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल

'अजूनही बरसात आहे' मालिकेतील मनू आलीय चर्चेत, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल

सोनी मराठी वाहिनीवर नुकतीच अजूनही बरसात आहे ही मालिका दाखल झाली आहे आणि या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचे मुख्य पात्र मीरा आणि आदिराज यांची कहाणी प्रेक्षकांना भावते आहे.या मालिकेच्या निमित्ताने तब्बल आठ वर्षानंतर मुक्ता बर्वे आणि उमेश कामत ही जोडी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळते आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत मीराची बहिण मनस्विनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

अजूनही बरसात आहे मालिकेत मनू अर्थात मनस्विनीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने. पूर्वा कौशिक मूळची अंबरनाथची मात्र सध्या ती ठाण्यात वास्तव्यास आहे. भगिनी मंडळ हायस्कुल आणि एस एम टी कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे.

कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका स्पर्धा मध्ये तिने सहभाग दर्शवला होता. कानाची घडी तोंडावर बोट या नाटकातून प्रसाद खांडेकर सोबत काम केले. पुढे ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन शोध नव्या विनोदवीरांचामध्ये तिने सहभाग घेऊन प्रेक्षकांना हसवले. फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेतूनही तिने महत्वाची भूमिका साकारली होती.

डोन्ट वरी हो जायेगा या नाटकात अभिनेते संजय खापरे यांच्यासोबत मुख्य नायिकेची भूमिका तिने बजावली होती. त्यानंतर आता पूर्वा कौशिक हळूहळू मालिका क्षेत्रात आपला जम बसवताना दिसते आहे. अजूनही बरसात आहे या मालिकेत पूर्वाला मनूची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. 


अभिनेत्री पूर्वा कौशिकने अमोघ फडके यांच्याशी लग्न केले आहे. अमोघ फडके हा देखील रंगभूमीवरचा कलाकार असून बॅकस्टेजला राहून नाटकांच्या प्रकाशयोजनाची जबाबदारी पार पाडत आहे.

चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना म्हणून अमोघला पुरस्कार देण्यात आला होता. सिंड्रेला या नाटकासाठीही त्याला झी गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. सर प्रेमाचं काय करायचं या व्यावसायिक नाटकासाठीही त्याला पारितोषिक देण्यात आले. 

Web Title: Who is the actress who plays the role of Manu, Meera's sister in 'Ajunahi Barsaat Aahe'?