मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून अजय भान हरपला, चेहऱ्यावर खूण देऊन गेला सिगरेटचा चटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:22 IST2026-01-13T19:21:26+5:302026-01-13T19:22:56+5:30
अजय देवगण ने सांगितला 'ये रास्ते हैं प्यार के'च्या सेटवरचा मजेदार किस्सा, म्हणाला "सिगारेट पिताना ती आली आणि..."

मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून अजय भान हरपला, चेहऱ्यावर खूण देऊन गेला सिगरेटचा चटका
मराठमोळ्या माधुरी दीक्षितच्या सौंदर्यावर भाळणारा एकही अभिनेता त्याकाळी नसेल. पण अभिनेता अजय देवगणसोबत घडलेली एक घटना ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 'ये रास्ते हैं प्यार के' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अजयने माधुरीकडे पाहण्याच्या नादात एक मोठी चूक केली होती, ज्याची खूण आजही त्याच्या चेहऱ्यावर आहे.
एका जुन्या मुलाखतीत अजय देवगणने या मजेशीर घटनेचा खुलासा केला होता. अजय म्हणाला, "शूटिंगच्या वेळी आम्ही सर्व कलाकार एकत्र बसलो होतो. मी गप्पा मारता मारता सिगारेट ओढत होतो, त्याच वेळी माधुरी तिथे आली आणि माझ्या शेजारी येऊन बसली. ती त्या दिवशी इतकी सुंदर दिसत होती की, मी तिच्याकडेच पाहत राहिलो आणि माझं सिगारेटकडे लक्षच राहिलं नाही".
अजयनं सांगितलं की, माधुरीला पाहण्याच्या नादात त्याने सिगारेट उलटी धरली आणि ती चक्क हनुवटीला लावली. यामुळे अजयला चटका बसला. विशेष म्हणजे, अजयने हसत हसत आपल्या हनुवटीकडे इशारा करत सांगितले की, त्या जखमेची खूण आजही तिथे आहे. ज्यावेळी अजय देवगण याने हा किस्सा सांगितले, त्यावेळी तिथे माधुरी दीक्षित ही देखील उपस्थित होती. अजय देवगण याचे हे बोलणे ऐकून माधुरी दीक्षित ही हसायला लागते.
दरम्यान, अजय लवकरच बहुप्रतिक्षित 'दृश्यम ३' आणि 'शैतान २' मध्ये दिसणार आहे. नुकताच त्याचा 'दे दे प्यार दे २' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर माधुरी अलीकडेच 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमध्ये दिसली. या सीरिजमधील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आहे.