जस्टीन बीबरकडे असं काय आहे, जे आजच्या अनेक पुरुषांकडे नाही?
By Admin | Updated: May 10, 2017 17:31 IST2017-05-10T16:33:04+5:302017-05-10T17:31:53+5:30
जस्टीनकडे आहेत अशा ४ गोष्टी, ज्यातली एकही अनेक पुरुषांकडे नसते!

जस्टीन बीबरकडे असं काय आहे, जे आजच्या अनेक पुरुषांकडे नाही?
मुंबई, दि. 10 - जस्टीन बीबर, त्याच्या दिवान्यांचे चर्चे काय सांगायचे? त्यातही जगभरातल्या मुली त्याच्यासाठी पागल झालेल्या आहेत. त्याच्या लव्ह लाईफचे चर्चेही गाजतात, आणि त्याच्या व्हिडीओमधल्या रोमान्स आणि विरहाची इण्टेसिटीही अनेकांना आपली वाटते. पण त्यापलकिडे जगभरात मुलीच नाही तर मुलंही त्याचे दिवाने आहेत, करोडो त्याचे चाहते आहेत, ते का? असं काय आहे जस्टीन बीबरकडे जे आजच्या अनेक पुरुषांकडे अजिबात नाही? अशा कुठल्या ४ गोष्टी जस्टीनकडे आहेत ज्यातली एकही गोष्ट अनेक पुरुषांना धड जमत नाही. आणि कशामुळे जस्टीनच्या ‘पुरुषी’ पर्सनॅलिटीतही स्त्री-पुरुष दोघांना भूरळ घालण्याची जादू येते?
पैसा तर जस्टीनकडे आहेच, वय वर्षे २३. पैसा काय वाट्टेल ते कमावू शकतो, लोकप्रिय व्हायला मदत करू शकतो याच काहीच शंका नाही. पण जगभरातल्या तरुण जगाला दिवानं करेल इतकी ताकद केवळ पैशात नाही, त्याचं काही सिक्रेट जस्टीनने बनवलेल्या स्वत:च्या पर्सनॅलिटीतही आहे. म्हणूनच त्याच्याकडे आहेत अशा ४ गोष्टी ज्या अनेक पुरुषांकडे अजिबात नसतात.
म्युझिकल, लिरीकल -
आता हे जरा अवघड आहे. जस्टीन ला जमतं तेवढं म्युझिक सगळ्यांनाच कसं जमावं? नाहीच जमत? पण म्युझिक आवडणं वेगळं, स्वत: गाणं वेगळं. अनेकजण ऐकतात उत्तम. पण चुकून कधी गुणगुणत नाहीत. ते स्वत:साठी गाणं, त्यात हरवून जाणं अनेकांना जमत नाही. आपल्या थोर्थोर हिंदी सिनेमानं किती वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय, गाना आए या ना आए, गाना चाहिए!