शाहिदच्या मिश्यांमुळे किस करताना झाला त्रास - कंगना

By Admin | Updated: February 2, 2017 15:51 IST2017-02-02T14:58:49+5:302017-02-02T15:51:20+5:30

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या 'रंगून' सिनेमामध्ये शाहिद कपूर आणि सैफ अली खानसोबत कंगना राणौत बोल्ड अंदाजात पाहायला मिळणार आहे.

What happened to Shahid's mischief? | शाहिदच्या मिश्यांमुळे किस करताना झाला त्रास - कंगना

शाहिदच्या मिश्यांमुळे किस करताना झाला त्रास - कंगना

 

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 -  विशाल भारद्वाज यांचा आगामी रोमॅन्टिक ड्रामा सिनेमा 'रंगून'ची सध्या बरीच चर्चा आहे. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या सिनेमामध्ये शाहिद कपूर आणि सैफ अली खानसोबत कंगना राणौत बोल्ड अंदाजात पाहायला मिळणार आहे. या सिनेमामध्ये कंगनाने बरेच इंटिमेट सीन दिले आहेत. 
 
इंटिमेट सीन शूटवेळी शाहिदला किस करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला, असे कंगनाने सांगितले. केवळ शाहिदच नव्हे तर सैफ अली खानसोबतही शूट करताना तोच प्रकार घडायचा, असेही कंगाना म्हणाली. शाहिद आणि सैफ अली खान या दोघांच्याही सिनेमामध्ये मिशा असल्याने इंटिमेट सीनवेळी दोघांनाही किस करताना ब-याच अडचणी आणि त्रास सहन करावा लागला, असे कंगनाने एका मुलाखतीत सांगितले. 
 
 
कंगनाने सैफसोबत बाथटबमध्ये इंटिमेट सीन दिला आहे. काही सीनमध्ये ती टॉपलेसदेखील दिसली आहे.  आतापर्यंत केलेल्या सिनेमांपैकी कंगना 'रंगून' मध्ये अधिक बोल्ड अवतारात दिसणार असल्याचे सिनेमाचे पोस्टर्स, गाणी, ट्रेलरवरुन पाहायला मिळत आहे. 
सिनेमामध्ये कंगना सिडक्ट्रेस जुलिया या स्टंट वुमनचा रोल साकारत आहे, तर सैफ एका सिनेनिर्माता असून त्याचे जुलियावर प्रेम असते.  
 
 
सिनेमामध्ये शाहिद कपूर एका सैनिकाची भूमिका साकारत आहे, ज्याचं नाव नवाब मलिक असे आहे. या सिनेमामध्ये लव्ह ट्रॅगल, रोमान्स, ड्रामा मसाला पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 24 फेब्रुवारी रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 
 
 
 

Web Title: What happened to Shahid's mischief?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.