देवयानी... काय करते?
By Admin | Updated: April 20, 2016 02:16 IST2016-04-20T02:16:35+5:302016-04-20T02:16:35+5:30
काही वर्षांपूर्वी एका वाहिनीवर देवयानी ही मालिका खूप गाजली होती. त्यातील देवयानी म्हणजेच शिवानी सुर्वे या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य केले होते

देवयानी... काय करते?
काही वर्षांपूर्वी एका वाहिनीवर देवयानी ही मालिका खूप गाजली होती. त्यातील देवयानी म्हणजेच शिवानी सुर्वे या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य केले होते. या मालिकेतील प्रत्येकाची भूमिका सक्षम झाली होती. प्रत्येक गृहिणीच्या हृदयात देवयानीने घर केले होते. तिने या भूमिकेत जीव ओतला होता. त्यामुळे साहजिकच, देवयानी कुठे आहे, सध्या तिचे काय चालले आहे या प्रश्नांत तिचे चाहते असणार आहेत. तर तिच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. देवयानी लवकरच एका हिंदी मालिकेतून परतणार आहे. ती सध्या राजस्थानमध्ये मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे शिवानी सुर्वे हिने ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना सांगितले. या मालिकेचे नाव ‘जाना ना जिनसे दूर’ हे असून ही मालिका लवकरच स्टार वाहिनीवर झळकणार आहे.