लंडनमध्ये चोरीला गेलं चहलच्या कथित गर्लफ्रेंडचं ब्रेसलेट; किंमत ऐकून चोरालाही बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:05 IST2025-07-16T14:05:33+5:302025-07-16T14:05:50+5:30
आरजे महवशचं ब्रेसलेट लंडनमध्ये चोरीला, किती होती किंमत?

लंडनमध्ये चोरीला गेलं चहलच्या कथित गर्लफ्रेंडचं ब्रेसलेट; किंमत ऐकून चोरालाही बसेल धक्का!
Yuzvendra Chahal and RJ Mahvash: क्रिकेटपटू युजवेंद्र चहलबरोबरच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे आरजे महवश सध्या देशभरात चर्चेत आहे. आरजे महवश आणि युजवेंद्र एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच तिच्या प्रत्येक पोस्टकडे नेटकऱ्यांचं लक्ष असतं. सध्या ते दोघे लंडनमध्ये एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचं बोललं जातंय. दोघांनीही सोशल मीडियावर लंडनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते एकत्र दिसत नसले तरी एकाच स्पॉटवर उभे राहून चहल आणि RJ महवश ने हे फोटो काढल्याचे दिसत आहे. दरम्यान, या लंडन ट्रीपमध्ये आरजे महवशचं ब्रेसलेट चोरीला गेलंय.
आरजे महवशनं इन्स्टाग्राम स्टोरीवर लंडन भेटीचा अनुभव शेअर केलाय. ज्यात तिनं लंडनचा उल्लेख 'चांदणी चौक' असा केला. "इथे खूप गर्दी आहे, सगळीकडे कचरा आहे आणि हो... चोरही आहेत" असं ती म्हणाली. फिरताना तिचं ब्रेसलेट चोरीला गेलं असून, त्याबद्दलही तिने सांगितलं.
आरजे महवशनं लिहलं, "खरोखर, लंडन हा युनायटेड किंगडमचा चांदणी चौक आहे. तिथे पाय ठेवायला जागा नाही. जितकी जास्त गर्दी, तितका जास्त कचरा. त्याशिवाय, इथे खूप चोर आहेत. माझ्या हातातील ब्रेसलेट चोरली गेलंय. एक व्यक्ती एकदा धडकला आणि हातातील ब्रेसलेट गायब झालं. पण, मीही म्हटलं जाऊद्या, ते फक्त २२० रुपयांचं होतं". आरजे महवशची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महवश अनेकदा सोशल मीडियावर मजेदार पोस्ट शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेते.
धनश्रीपासून वेगळे झाल्यानंतर चहल RJ महवशला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं. दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलसोबत आरजे महवश दिसल्यानंतर ती चर्चेत आली होती. आयपीएलच्या सामन्यांदरम्यानही RJ महावश स्टेडियममध्ये चहलला चिअर अप करताना दिसली होती. तर आयपीएलच्या पार्टीमध्येही तिला स्पॉट करण्यात आलं होतं.