'पंचायत ३'मध्ये फुलेराचा नवा सचिव बनणार रितेश देशमुख? अभिनेत्याच्या व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 11:17 IST2024-05-14T11:17:37+5:302024-05-14T11:17:55+5:30

'पंचायत ३'मध्ये रितेश देशमुखची एन्ट्री? अभिषेक त्रिपाठीला करणार रिप्लेस?

will ritesh deshmukh seen to play sachiv in panchayat 3 actor video goes viral | 'पंचायत ३'मध्ये फुलेराचा नवा सचिव बनणार रितेश देशमुख? अभिनेत्याच्या व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

'पंचायत ३'मध्ये फुलेराचा नवा सचिव बनणार रितेश देशमुख? अभिनेत्याच्या व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

'पंचायत' ही गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या काही मोजक्या वेब सीरिजपैकी एक आहे. पहिल्या दोन पर्वांना प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर 'पंचायत' वेब सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'पंचायत ३' ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. काही दिवसांपूर्वीच पंचायत ३चं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं.  त्यामुळे या 'पंचायत ३'बाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पण, पंचायत ३मध्ये एक मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. 

'पंचायत'मध्ये अभिनेता अभिषेक त्रिपाठीने जितेंद्र कुमारची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण, 'पंचायत ३'मध्ये तो दिसणार की नाही, याबाबत चर्चा रंगल्या आहे. 'पंचायत ३'ची घोषणा झाल्यानंतर प्राइम व्हिडिओकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. यामध्ये "क्या आप बनोगे फुलोरा के अगले सचिव? अपना CV भेजीये", असं म्हटलं गेलं होतं. याशिवाय 'पंचायत ३'च्या पोस्टरमध्येही जितेंद्र कुमार न दिसल्याने चाहते संभ्रमात होते. अशातच आता रितेश देशमुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे चाहत्यांचं कन्फ्युजन आणखी वाढलं आहे. 

रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, "नमस्ते, प्रधान जी...मी रितेश देशमुख. नवीन सचिवच्या शोधात तुम्ही आहात, असं मी ऐकलंय. तुम्ही डोळे बंद करून माझी निवड करा. कारण, माझ्यापेक्षा जास्त कौटुंबिक व्यक्ती तुम्ही पाहिला आहे का? माझे अभिषेकसारखे नखरे पण नाहीत. मला कशी पण खोली मिळू दे...तिथे बर्थ डे पार्टी होऊ दे नाहीतर लग्न..मी सगळ्यात अॅडजस्ट करतो. मी थोडाफार डान्सही करतो. म्हणजे कामही आणि मनोरंजनही...२४ तास मी पुस्तके वाचत बसणार नाही. तुमच्यासाठी एक स्पेशल मेसेज आहे. मला फुलेराचा नवीन सचिव बनवा. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील. मी जातो आता...माझी जेवणाची वेळ झाली. आज दुधीची भाजी, दुधीचे पराठे आणि दुधीचा हलवा...".  

रितेशचा हा व्हिडिओ पाहून 'पंचायत ३'मध्ये तो फुलेराचा नवीन सचिव बनलेला दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

Web Title: will ritesh deshmukh seen to play sachiv in panchayat 3 actor video goes viral