प्रतीक्षा संपली! 'वेन्सडे सीझन २' प्रेक्षकांच्या भेटीला, भारतात कधी आणि कुठे पाहता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:42 IST2025-08-06T16:39:16+5:302025-08-06T16:42:05+5:30

वेन्सडे (Wednesday) मालिकेचा दुसरा सीझन (Season 2) लवकरच येत आहे.

Wednesday Season 2 Release Schedule Ott India Date Time Episodes | प्रतीक्षा संपली! 'वेन्सडे सीझन २' प्रेक्षकांच्या भेटीला, भारतात कधी आणि कुठे पाहता येईल?

प्रतीक्षा संपली! 'वेन्सडे सीझन २' प्रेक्षकांच्या भेटीला, भारतात कधी आणि कुठे पाहता येईल?

Wednesday Season 2: 'वेन्सडे' (Wednesday) ही एक अशी सीरिज (Web Seres) आहे, ज्याची जगभरात खूप चर्चा आहे. या सीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग (Season 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये अभिनेत्री जेना ओर्टेगा (Jenna Ortega) पुन्हा एकदा 'वेन्सडे ॲडम्स'च्या (Wednesday Addams) प्रमुख भूमिकेत झळकली आहे. नव्या सीझनमध्ये रहस्य, अलौकिक घटना आणि भावनिक गुंतागुंत यांचं अनोखं मिश्रण पाहायला मिळतंय.

'वेन्सडे २' ची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रीमियरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरिजचे भारतात मोठे चाहते आहेत. 'वेन्सडे २'चा अधिकृत ट्रेलर ९ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 'वेन्सडे'ची कथा 'वेन्सडे ॲडम्स' या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. या सीरिजमध्ये जेन्ना ओर्टेगा निभावत असलेलं पात्र 'वेन्सडे ॲडम्स' हिला नेव्हरमोर अकादमीमध्ये परतल्यानंतर नवीन अडचणी आणि विरोधकांचा सामना करावा लागणार असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळालं आहे. त्यामुळे दुसरा सीझन हा आणखी रोमांचक आहे.

'वेन्सडे २'चा दुसरा सीझन हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होतोय. याचा पहिला भाग हा आज ६ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आहे. ज्यामध्ये १ ते ४ भाग आहेत. त्यानंतर, दुसरा भाग ३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल, ज्यामध्ये ५ ते ८ भाग असतील. त्यामुळे प्रेक्षकांना दुसरा भाग पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 


Web Title: Wednesday Season 2 Release Schedule Ott India Date Time Episodes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.