प्रतीक्षा संपली! TVF च्या 'Aspirants' सीझन ३ ची घोषणा; 'या' दिवशी रिलीज होणार सीरिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:25 IST2026-03-02T14:21:37+5:302026-03-02T14:25:50+5:30

तुम्हीही आहात का टीव्हीएफ ओरिजनल सीरिजचे चाहते?

The wait is over TVF's 'Aspirants' Season 3 announced know release date of the series | प्रतीक्षा संपली! TVF च्या 'Aspirants' सीझन ३ ची घोषणा; 'या' दिवशी रिलीज होणार सीरिज

प्रतीक्षा संपली! TVF च्या 'Aspirants' सीझन ३ ची घोषणा; 'या' दिवशी रिलीज होणार सीरिज

टीव्हीएफच्या (TVF)ओरिजनल सीरिजचे चाहते असाल तर एक आनंदाची बातमी आहे.  'पंचायत' असो, 'गुल्लक' असो किंवा 'कोटा फॅक्टरी'. याशिवाय एक अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणजे 'ॲस्पिरेंट्स' (Aspirants), जिने लोकप्रियतेच्या बाबतीत पंचायत आणि गुल्लक सारख्या मालिकांनाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, IMDb वर या मालिकेला ९.१ रेटिंग मिळाले आहे, जे 'पंचायत' पेक्षाही अधिक आहे. आता या बहुप्रतिक्षित मालिकेचा तिसरा सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाला आहे.  नुकतीच याची अधिकृत घोषणा झाली आहे. मेकर्सने आज सीरिजचे नवीन पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

या नवीन सीझनमध्ये अभिनेता नवीन कस्तुरिया पुन्हा एकदा 'अभिलाष'च्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करताना लिहिले की, "प्रिपरेशन फक्त करिअरचं नाही, तर नात्यांचं सुद्धा." या घोषणेमुळे अभिलाष, एसके आणि गुरी या मित्रांच्या आयुष्यात पुढे काय घडणार, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.  नवीन सीझनचे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले असून १३ मार्चपासून हा शो प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केला जाणार आहे. 


'एस्पिरेंट्स'च्या तिसऱ्या सीझनची कथा अभिलाषच्या दोन टाईमलाईनमध्ये मांडण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी (DM) असलेल्या अभिलाषविरुद्ध सहाय्यक कामगार आयुक्त (ALC) संदीपन यांच्याकडून चौकशी सुरू केली जाते. या कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांच्या मैत्रीत, कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण होतो, तर दुसरीकडे कामाच्या ठिकाणी एका नवीन प्रतिस्पर्ध्यामुळे त्यांच्यासमोर मोठी आव्हाने उभी राहतात.

या मालिकेत नवीन कस्तुरियासह शिवांकित सिंग परिहार, अभिलाष थपलियाल, सनी हिंदुजा आणि नमिता दुबे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मागील दोन सीझनमध्ये यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी आणि प्रशासकीय सेवेतील जबाबदाऱ्यांची कथा होत. तिसऱ्या सीझनमध्ये प्रशासकीय नोकरीतील वास्तव आणि वैयक्तिक नात्यांमधील संघर्षावर अधिक प्रकाश टाकला जाणार आहे.

Web Title : एस्पिरेंट्स सीजन 3 की घोषणा: टीवीएफ की लोकप्रिय सीरीज की रिलीज डेट!

Web Summary : टीवीएफ की लोकप्रिय सीरीज 'एस्पिरेंट्स' सीजन 3 के साथ वापसी कर रही है, जो 13 मार्च से प्राइम वीडियो पर स्ट्रीमिंग होगी। यह सीजन अभिलाष के डीएम के रूप में जीवन, पेशेवर चुनौतियों और तनावपूर्ण व्यक्तिगत संबंधों पर केंद्रित है। सीरीज में नवीन कस्तूरिया, शिवांकित सिंह परिहार और अभिलाष थपलियाल हैं।

Web Title : Aspirants Season 3 Announced: TVF's Popular Series Release Date Revealed!

Web Summary : TVF's popular series 'Aspirants' returns for Season 3, streaming on Prime Video from March 13. The season focuses on Abhilash's life as a DM, facing professional challenges and strained personal relationships. The series stars Naveen Kasturia, Shivankit Singh Parihar, and Abhilash Thapliyal.