'The Bads of Bollywood'मधील रहस्यमय पात्र! भेटा ऑनस्क्रीन गफूरच्या फिल्ममेकर मुलीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:04 IST2025-10-02T12:03:42+5:302025-10-02T12:04:41+5:30
The Bads of Bollywood Web Series : गफूरची मुलगी नेहमी बुरख्यात दिसते, तिचा चेहरा झाकलेला असतो. पडद्यावर प्रेक्षक तिला कधीही पाहू शकले नाही, पण तिचा आवाज मात्र नक्कीच ऐकतात.

'The Bads of Bollywood'मधील रहस्यमय पात्र! भेटा ऑनस्क्रीन गफूरच्या फिल्ममेकर मुलीला
आर्यन खानने वेब सिरीज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' (The Bads of Bollywood) मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि तो लगेचच यशस्वी ठरला. आर्यनच्या व्हिजनची, त्याच्या दमदार कथा-मांडणीची सगळीकडे प्रशंसा होत आहे. संवादांसोबतच याची कलाकारांची निवड खूप विचारपूर्वक केली गेली आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सर्व कलाकारांचे कौतुक झाले, पण या शोमध्ये एक व्यक्तिरेखा अशीही होती, जिचा चेहरा कधी समोर आलाच नाही. कथानकात तिची भूमिका छोटी होती, पण जेव्हा सगळ्या कलाकारांबद्दल चर्चा होत आहे. पण बुरख्याखाली चेहरा झाकलेल्या अभिनेत्रीचा अद्याप चेहरा समोर आलेला नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती?
अरशद वारसीने साकारलेला 'गफूर'ने कथा पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या मालिकेत गफूर मुख्य पात्र आसमान सिंगला किडनॅप करतो, जेणेकरून आसमानचा चाहता असलेली त्याची मुलगी त्याला भेटू शकेल आणि आपली स्क्रिप्ट त्याला देऊ शकेल. सीरिजमध्ये गफूरची मुलगी एका महत्वाकांक्षी चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारते, जिला आसमानसोबत चित्रपट बनवायचा आहे.
या अभिनेत्रीने साकारलीय गफूरच्या लेकीची भूमिका
गफूरची मुलगी नेहमी बुरख्यात दिसते, तिचा चेहरा झाकलेला असतो. पडद्यावर प्रेक्षक तिला कधीही पाहू शकले नाही, पण तिचा आवाज मात्र नक्कीच ऐकतात. आर्यन खान दिग्दर्शित पहिल्या सीरीजमध्ये ही भूमिका कंचन खिलारे (Kanchan Khilare)ने साकारली आहे. सीरिजच्या यशानंतर, कंचनने सोमवारी इंस्टाग्रामवर या प्रोजेक्टवर काम करण्याच्या तिच्या अनुभवाविषयी एक व्हिडीओ शेअर केला. तिने सांगितले की, सुरुवातीला तिने या भूमिकेबद्दल फारसा विचार केला नव्हता, फक्त या सीरीजचे निर्माते असलेल्या शाहरुख खानला भेटण्याची तिची इच्छा होती. तिला वाटले होते की, कोणी तिला ओळखणार नाही, परंतु जेव्हा तिच्या जवळच्या मित्रांनी तिला ओळखले, तेव्हा तिने त्या सीक्रेट मुलीच्या भूमिकेबद्दल मोकळेपणाने बोलण्याचा निर्णय घेतला, जिचा चेहरा कधीही दाखवला गेला नाही.
या हॉलिवूड भूमिकेसाठी दिले होते ऑडिशन
या सीरिजमध्ये कंचनने लक्ष्य, राघव जुयाल, मनोज पाहवा, अरशद वारसी आणि अन्या सिंग यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे, कंचनने हॉलिवूड चित्रपट हार्ट ऑफ स्टोनमध्ये केया धवनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते, जी भूमिका नंतर आलिया भटला मिळाली. दोन वर्षांपूर्वीच्या एका व्हिडीओमध्ये, तिने खुलासा केला होता की ही भूमिका न मिळाल्याचे तिला कोणतेही दुःख नाही. त्याऐवजी, तिने याला तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा क्षण मानले.