मनोज वाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन 3'मध्ये दमदार अभिनेत्याची एन्ट्री? नाव ऐकून तुम्ही आनंद व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 14:32 IST2024-09-20T14:31:26+5:302024-09-20T14:32:05+5:30

'द फॅमिली मॅन' सिरीजच्या तिसऱ्या सीझन संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. 

The Family Man 3 update Jaideep Ahlawat To Join Manoj Bajpayee Web Series | मनोज वाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन 3'मध्ये दमदार अभिनेत्याची एन्ट्री? नाव ऐकून तुम्ही आनंद व्हाल!

मनोज वाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन 3'मध्ये दमदार अभिनेत्याची एन्ट्री? नाव ऐकून तुम्ही आनंद व्हाल!

The Family Man 3   : 'द फॅमिली मॅन' ही सर्वात गाजलेली वेब सिरीज आहे. या सिरीजचे आधीचे दोन भाग प्रेक्षकांना फार आवडले.  राज आणि डीके यांनी बनवलेल्या या सिरीजमधील मनोज ( Manoj Bajpayee) यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. आता चाहत्यांना मनोज यांच्या 'द फॅमिली मॅन' या वेबसिरीजच्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे. अशातच आता 'द फॅमिली मॅन' सिरीजच्या तिसऱ्या सीझन संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. 

मनोज वाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन' सिरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये एका दमदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे हा सीझन खऱ्या अर्थाने थ्रिलर असणार आहे. कारण, 'द फॅमिली मॅन'मध्ये एन्ट्री घेणार अभिनेता आहे जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat ). मनोज वाजपेयी स्टारर वेब सिरीज  'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनमध्ये जयदीप पाहायला मिळणार आहे. मात्र, यामधील त्याची भुमिका काय असेल, याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. 


रिपोर्टनुसार, द फॅमिली मॅन' सिरीजच्या तिसऱ्या सीझनची शुटिंग सुरू आहे. लवकर ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या सीझनमध्ये मनोज यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाचे अ‍ॅक्शन सीन्स चाहत्यांना प्रचंड आवडले.  सिरीजच्या दुसऱ्या सीझनच्या शेवटी आता पुढल्या सीझनमध्ये श्रीकांत तिसऱ्या कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना दिसणार आहे, असे संकेत देण्यात आले होते. आता सीझन ३ मध्ये निर्माते प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येतात हे पाहणं खरोखरच मनोरंजक असेल.

Web Title: The Family Man 3 update Jaideep Ahlawat To Join Manoj Bajpayee Web Series