'द फॅमिली मॅन ३'मध्ये 'या' सुपरस्टारचा कॅमिओ, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:10 IST2025-11-25T13:07:32+5:302025-11-25T13:10:58+5:30
सीक्रेट कॅमियोचा धमाका, 'द फॅमिली मॅन ३'नं प्राइम व्हिडीओच्या टॉप १० लिस्टमध्ये नंबर १ स्थान पटकावलं

'द फॅमिली मॅन ३'मध्ये 'या' सुपरस्टारचा कॅमिओ, कोण आहे तो?
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेते मनोज वाजपेयी यांची लोकप्रिय सीरिज 'द फॅमिली मॅन ३'चा सध्या सगळीकडे बोलबाला सुरू आहे. हा तिसरा सीझन २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रिलीज करण्यात आला. रिलीज होताच या तिसऱ्या सीझनने ओटीटीवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. रिलीजच्या अवघ्या काही दिवसांतच या सीरिजनं प्राइम व्हिडीओच्या टॉप १० लिस्टमध्ये नंबर १ स्थान पटकावलं आहे. मनोज आणि जयदीप अहलावत यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांकडून जबरदस्त दाद मिळते आहे. दोघांनीही आपल्या पात्रांना न्याय दिल्याचं प्रेक्षक आणि समिक्षकांनी म्हटलं आहे. विशेेष म्हणजे सीरिजमधील साऊथ सुपरस्टारचा कॅमिओ तर प्रेक्षकांना पसंत पडलाय.
'द फॅमिली मॅन ३'मध्ये विजय सेतुपतीचा कॅमियो आहे. मनोज वाजपेयींसोबत त्याचा एक खास सीन आहे. या सरप्राईज कॅमियोमुळे फॅन्स अक्षरशः आनंदी झालेत. दोघांचा एकत्र सीन हा या सीझनमधील सर्वोत्कृष्ट क्षण असल्याचं चाहत्यांनी म्हटलं. सीरिजमध्ये विजय फक्त काही मिनिटांसाठीच दिसत आहे. परंतु त्याची ही भूमिका कथेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
#vijaysethupathi cameo in Family Man s3!!!! 🙀🔥 pic.twitter.com/8jFTdL7Hsy
— Shefali F (@f_shefali) November 21, 2025
‘'द फॅमिली मॅन'चा पहिला सीझन २०१९ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर दूसरा सीझन २०२१ मध्ये आला होता. हे दोन्ही सीझन गाजले होते. त्यानंतर आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेळची कथा मागील दोन्ही सीझनपेक्षा खूप वेगळी आहे. सीझनमध्ये एकूण ७ एपिसोड आहेत आणि शेवटच्या एपिसोडमध्ये कथा अशा वळणावर येते, जिथे श्रीकांत मृत्यू आणि जीवनाच्या लढाईत उभा आहे. त्यामुळे 'द फॅमिली मॅन'चा चौथा सीझन येणार असल्याचंही कन्फर्म झालंय.