आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा दुसरा सीझन येणार? समोर आलं मोठं अपडेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:14 IST2025-09-29T12:14:22+5:302025-09-29T12:14:42+5:30

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा दुसरा सीझन कधी येणार? वेब सीरिजमधील अभिनेत्याने केला खुलासा

The Bads Of Bollywood Season 2 In The Works Reveals Rajat Bedi | आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा दुसरा सीझन येणार? समोर आलं मोठं अपडेट!

आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा दुसरा सीझन येणार? समोर आलं मोठं अपडेट!

'The Bads Of Bollywood' ही सीरिज सध्या चर्चेचा विषय आहे. सर्वत्र या सीरिजचीच हवा आहे, असं म्हणणं अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यात किंग खानच्या अर्थात शाहरुख खानचा लेक आर्यन खानची ही सीरिज असल्यामुळे त्याला वेगळं वलय प्राप्त झालं आहे. आर्यन खानने 'The Bads Of Bollywood'चं दिग्दर्शन केलंय. दिग्दर्शक म्हणून आर्यनची ही पहिलीच कलाकृती असली तरीही कथेवर त्याने केलेलं काम जबरदस्त आहे.  १९ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली ही सीरिज भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.  या यशानंतर आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

अभिनेता रजत बेदीनं या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची (Season 2) पुष्टी केली आहे. रजत बेदीनं नुकतंच न्यूज१८ शोशी बोलताना सीझन २ बद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, "हो, शोचा दुसरा सीझन बनवला जात आहे. काम सुरू आहे आणि मला आशा आहे की या सीझनमध्ये प्रेक्षक मला जास्त पाहतील".


शाहरुख खानच्या रेड चिलीजने निर्मिती केलेल्या या सीरिजने बॉलीवूडच्या ९० च्या दशकातील चित्रपट शैलीला एका नवीन पद्धतीने दाखवले आहे. लक्ष्य, राघव जुयाल, मनोज पाहवा आणि बॉबी देओल यांच्याव्यतिरिक्त, या शोमध्ये रणवीर सिंग आणि रणबीर कपूर सारख्या प्रमुख कलाकार पाहायला मिळाले. इतकंच नव्हे, तर आमिर, सलमान आणि शाहरुख खान सारख्या सुपरस्टार्सनीही आर्यनला पाठिंबा दिला. The Ba***ds of Bollywood ला IMDb वर ७.७ ची रेटिंग मिळालं आहे. या सीरिजमध्ये ७ एपिसोड्स असून प्रत्येक एपिसोड ४० मिनिटांपेक्षा जास्त आहे. पण हे पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, कारण आर्यनने बॉलिवूडची ग्लॅमर जवळून दाखवलं आहे. त्यात एकाच फ्रेममध्ये अनेक कलाकारांना उभं केलं आहे.

Web Title : आर्यन खान की 'द बैड्स ऑफ बॉलीवुड' का दूसरा सीजन कन्फर्म!

Web Summary : आर्यन खान द्वारा निर्देशित 'द बैड्स ऑफ बॉलीवुड' का दूसरा सीजन रजत बेदी ने कन्फर्म किया। नेटफ्लिक्स पर ट्रेंड कर रही यह सीरीज बॉलीवुड का ग्लैमर दिखाती है। नए सीजन में बेदी की बड़ी भूमिका होगी।

Web Title : Aryan Khan's 'The Bads of Bollywood' Season 2 Confirmed!

Web Summary : Rajat Bedi confirms a second season of 'The Bads of Bollywood,' directed by Aryan Khan. The series, trending on Netflix, showcases Bollywood's glamour. The new season promises Bedi will have a larger role.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.