'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका अन् सुप्रिया सुळेंचा मेसेज, प्रिया बापटने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 15:05 IST2024-11-11T15:04:03+5:302024-11-11T15:05:04+5:30

प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे.

Supriya Sule Appreciate Priya Bapat For Her Female Chief Minister Role In City Of Dreams Web Series | 'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका अन् सुप्रिया सुळेंचा मेसेज, प्रिया बापटने सांगितला किस्सा

'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका अन् सुप्रिया सुळेंचा मेसेज, प्रिया बापटने सांगितला किस्सा

Priya Bapat : अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच प्रिया बापट. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. 'सिटी ऑफ ड्रिम्स'  (City Of Dreams) तिची ही वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेब सिरिजचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रियाने साकारलेली पूर्णिमा गायकवाड ही भुमिका चाहत्यांच्या पसंतीस पडली. तिची ही भुमिका पाहून थेट खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रियाला मेसेज केला होता. 

'सिटी ऑफ ड्रिम्स'चा पहिला सीझन 1 हा 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर सीरीजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. नुकतंच प्रिया बापट हिने कुणाल विजयकर यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये प्रिया 'सिटी ऑफ ड्रिम्स' सीरिजवर भरभरुन बोलली. यावेळी प्रियाने खुलासा केला की, सीरीजमध्ये तिने साकारलेली महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका पाहून सुप्रिया सुळे यांनी तिचं कौतुक केलं होतं. 

मुलाखतीमध्ये कुणाल विजयकर म्हणातात, "'सिटी ऑफ ड्रिम्स'मध्ये  तू सुप्रिया सुळेंसारखी दिसली आहेस. सुप्रिया माझी चांगली मैत्रीण आहे. म्हणून मी असे म्हणू शकतो". यावर प्रिया हसत म्हणते,  "पण आम्ही असा दावा करत नाही". यावर कुणाल म्हणाले, "तु कुठे म्हणालीस.. मी म्हणतोय".पुढे सुप्रिया यांच्याबद्दल बोलताना प्रिया म्हणाली,  "पण मला असं वाटतं की, त्यांनी ती सीरिज पाहिली आहे. कारण त्यानंतर त्यांचा मला मेसेज आला होता". 

'सिटी ऑफ ड्रिम्स'बद्दल बोलताना प्रिया म्हणाली, मला पोर्णिमा गायकवाड साकारण्याची संधी मिळाली यासाठी कृतज्ञ आहे. त्याला मी माझा डेब्यू शो म्हणते. कारण, मुन्ना भाई चित्रपट हा ठरवून केला नव्हता. पण,  'सिटी ऑफ ड्रिम्स' ही मी निवडली होती. मला मराठीमधून हिंदीत जाण्यासाठी ती सीरीज मी निवडली". दरम्यान, 'सिटी ऑफ ड्रिम्स'च्या चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 
 

Web Title: Supriya Sule Appreciate Priya Bapat For Her Female Chief Minister Role In City Of Dreams Web Series