Squid Game 3 Trailer: पुन्हा फासे पलटणार! गेम तेच पण नियम बदलले, कधी प्रदर्शित होणार 'स्क्विड गेम ३'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 15:44 IST2025-06-01T15:44:23+5:302025-06-01T15:44:37+5:30

गेल्याच महिन्यात 'स्क्विड गेम ३'चा टीझर प्रदर्शित झाला होता. आता 'स्क्विड गेम ३'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

squid game 3 trailer web series final season will released on 27th june | Squid Game 3 Trailer: पुन्हा फासे पलटणार! गेम तेच पण नियम बदलले, कधी प्रदर्शित होणार 'स्क्विड गेम ३'

Squid Game 3 Trailer: पुन्हा फासे पलटणार! गेम तेच पण नियम बदलले, कधी प्रदर्शित होणार 'स्क्विड गेम ३'

ओटीटीवरील गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक म्हणजे 'स्क्विड गेम'. या कोरियन वेब सीरिजचे दोन्ही सीझन प्रचंड हिट ठरले. त्यानंतर आता सीरिजचा तिसरा आणि शेवटचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्याच महिन्यात 'स्क्विड गेम ३'चा टीझर प्रदर्शित झाला होता. आता 'स्क्विड गेम ३'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 

'स्क्विड गेम ३'च्या ट्रेलरमध्ये पुन्हा स्पर्धक नवीन गेम खेळताना दिसत आहेत. खेळ जुनेच असले तरी यावेळेस मात्र त्याचे नियम बदलले आहेत. पुन्हा स्पर्धकांना जीवन मरणाचा खेळ करत अंतिम खेळापर्यंत पोहोचायचं आहे. आधीच एक गेम जिंकलेला स्पर्धक ४५६ शेवटपर्यंत जात असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यासोबतच मुखवट्यामागचे अनेक चेहरेही समोर येत असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. आता या सीझनच्या शेवटी काय होणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

२०२१ मध्ये 'स्क्विड गेम'चा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २६ डिसेंबर २०२४ ला दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता येत्या २७ जूनला 'स्क्विड गेम ३' प्रदर्शित केला जाणार आहे. नेटफ्लिक्सवर 'स्क्विड गेम'चा पुढचा आणि शेवटचा सीझन भरपूर ट्विस्टसह पाहायला मिळणार आहे. 
 

Web Title: squid game 3 trailer web series final season will released on 27th june