हिम्मत सिंग इज बॅक! 'Special Ops 2' ट्रेलर प्रदर्शित, कधी आणि कुठे पाहाल सीरिज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:50 IST2025-06-16T18:48:10+5:302025-06-16T18:50:15+5:30
'हिम्मत सिंह'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार Special Ops 2

हिम्मत सिंग इज बॅक! 'Special Ops 2' ट्रेलर प्रदर्शित, कधी आणि कुठे पाहाल सीरिज?
Specials Ops 2 Official Trailer: 'स्पेशल ओप्स' या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती. त्यानंतर या सीरिजचा Special Ops 1.5 हा सीझन प्रदर्शित झाला होता. अभिनेता के. के मेनन (Kay Kay Menon) यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. के. के मेनन यांनी हिम्मत सिंह या रॉ एजंटची भूमिका 'स्पेशल ओप्स'मध्ये साकारली होती. आता या वेब सीरिजचा दुसरा सीझन येतोय. 'स्पेशल ऑप्स २' ची रिलीज डेट जाहीर झाली असून ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
'स्पेशल ऑप्स २' येत्या ११ जुलै २०२५ पासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. या अॅक्शन थ्रिलर सीरिजमध्ये के. के मेनन मुख्य भूमिकेत आहेत. त्यासोबत विनय पाठक, सय्यामी खेर, ताहिरराज भासीन, दलीप ताहिल, गौतमी कपूर हे कलाकारही दिसणार आहेत. 'स्पेशल ऑप्स २'कडून चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे आणि ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
के. के मेनन यांनी 'स्पेशल ऑप्स २'मधील त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं की, "हिम्मत सिंग नेहमीच शौर्य, बुद्धिमत्ता आणि अनुभवाच्या बळावर लढला आहे. पण, यावेळी युद्ध दिसत नाहीये, धोके मोठे आणि अज्ञात आहेत. ज्यामुळे हा सीझन केवळ प्रासंगिकच नाही, तर माझ्यासाठी एक अतिशय वैयक्तिक अनुभवही बनला आहे. हिम्मत सिंगच्या खांद्यावर जबाबदारी, त्याग आणि इतर अनेक गोष्टींचे ओझे आहे. यावेळी मला केवळ एक रणनीतिकारच नाही तर या मोहिमेमागील माणूस म्हणून भूमिका साकारण्याची संधी मिळाली, जो एक पिता, देशभक्त आणि खरा रक्षक आहे".