'मिसेस देशपांडे' शूटच्या शेवटच्या दिवशी..., सिद्धार्थ चांदेकरने माधुरी दीक्षितसाठी लिहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:58 IST2026-01-20T15:57:37+5:302026-01-20T15:58:16+5:30

माधुरी दीक्षितच्या लेकाच्या भूमिकेत दिसला सिद्धार्थ चांदेकर

siddharth chandekar expressed his fan moment on the set of mrs deshpande series | 'मिसेस देशपांडे' शूटच्या शेवटच्या दिवशी..., सिद्धार्थ चांदेकरने माधुरी दीक्षितसाठी लिहिली पोस्ट

'मिसेस देशपांडे' शूटच्या शेवटच्या दिवशी..., सिद्धार्थ चांदेकरने माधुरी दीक्षितसाठी लिहिली पोस्ट

काही दिवसांपूर्वीच जिओ हॉटस्टारवर माधुरी दीक्षितची 'मिसेस देशपांडे' सीरिज आली. या सीरिजमध्ये माधुरी पहिल्यांदाच सीरियल किलरच्या भूमिकेत दिसली. सस्पेन्स, थ्रिलर कंटेंटचे जे चाहते आहेत त्यांना ही सीरिज प्रचंड आवडली. नागेश कुकनूर यांनी सीरिज दिग्दर्शित केली होती. तर मराठी अभिनेतासिद्धार्थ चांदेकरही यामध्ये होता. त्याने माधुरीच्या मुलाची भूमिकेत होता. आता नुकतंच त्याने माधुरीसोबतचा फोटो शेअर करत छानसं कॅप्शन लिहिलं आहे.

माधुरी दीक्षितचे चाहते कोण नाहीत? तिच्या सौंदर्यावर, तिच्या गोड स्माईलवर आजही सगळेच फिदा आहेत. सिद्धार्थ चांदेकरला तर तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सीरिजमध्ये तो पोलिस अधिकारी आहे जो माधुरीचा मुलगाच आहे. माधुरीसोबतचा सेल्फी शेअर करत त्याने लिहिले, "एक वर्षापूर्वी आम्ही मिसेस देशपांडे सीरिजचं शूट संपवलं. संपूर्ण ६० दिवसांच्या शूटिंगमध्ये मी माधुरीसोबत फोटो काढण्यापासून स्वत:वर नियंत्रण ठेवलं होतं. पण शेवटच्या दिवशी माझ्यातला चाहता जागा झाला आणि माझं स्वत:वरचं नियंत्रण सुटलं. my fan moment"


सिद्धार्थ चांदेकरची ही पोस्ट वाचून कोणीही चाहता सहमत असेल. माधुरी ८०-९० च्या दशकात तरुणाईच्या हृदयाची धडकन होती. आजही तिच्या सौंदर्यात थोडीही कमी जाणवत नाही. तिचे एक्सप्रेशन्स आजही हृदयाचा ठोका चुकवणारे आहेत. तिला इतक्या वर्षांनी पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत पाहून सर्वांनाच मजा आली. 'मिसेस देशपांडे' सीरिजचा पुढचा पार्टही येईल अशी चर्चा आहे. 

Web Title : 'मिसेस देशपांडे' के आखिरी दिन माधुरी दीक्षित के लिए सिद्धार्थ चांदेकर का पोस्ट

Web Summary : सिद्धार्थ चांदेकर ने 'मिसेस देशपांडे' में माधुरी दीक्षित के साथ काम करने के बारे में एक पोस्ट साझा की। उन्होंने श्रृंखला में उनके बेटे की भूमिका निभाई और शूटिंग के अंतिम दिन उनके साथ एक तस्वीर ली, 60 दिनों तक विरोध करने के बाद एक प्रशंसक पल को पूरा किया। सीरीज को अच्छी प्रतिक्रिया मिली है।

Web Title : 'मिसेस देशपांडे'च्या शेवटच्या दिवशी माधुरी दीक्षितसाठी सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट

Web Summary : 'मिसेस देशपांडे'मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम केल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरने खास पोस्ट शेअर केली. मालिकेत त्याने माधुरीच्या मुलाची भूमिका साकारली होती. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्याने माधुरीसोबत फोटो काढला, कारण ६० दिवस तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.