पहिल्या भेटीत सुष्मिता सेन कशी वागली? श्रीगौरी सावंत यांनी सांगितली आठवण, म्हणाल्या- "तिने मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:57 IST2026-01-06T12:49:51+5:302026-01-06T12:57:15+5:30
"विश्वसुंदरीने मला...", श्री गौरी सावंत यांनी सांगितला सुश्मिता सेनच्या भेटीच्या किस्सा, ताली मधील भूमिकेबद्दल म्हणाल्या...

पहिल्या भेटीत सुष्मिता सेन कशी वागली? श्रीगौरी सावंत यांनी सांगितली आठवण, म्हणाल्या- "तिने मला..."
Gaui Sawant Reaction On Taali Webseries: बॉलिवूड अभिनेत्री, विश्वसुंदरी सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि चित्रपटांमुळे देखील तितकीच ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, साल २०२३ मध्ये आलेल्या ताली या वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली होती. ताली ही वेब सीरिज तृतीय पंथीयांसाठी झटणाऱ्या आणि त्यांच्या हक्कांसाठी उभ्या असणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता सेनने गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. नुकतीच श्रीगौरी सावंत यांनी दिलेल्या सुष्मिता सेनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे.तसेच ताली पाहिल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितलं आहे.
नुकतीच गौरी सावंत यांनी 'आरपार'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पहिल्यांदा भेटल्यानंतर सुष्मिता सेन कशी वागली, याविषयी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्या म्हणाल्या,"असिफा नाडियाडवाला यांनी मला एकदा फोन केला. ती म्हणाली, मला तुमच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा. तेव्हा मी तिचा फोन ठेवला आणि ब्लॅकलिस्टला टाकला होता.कारण ती सारखी फोन करायची. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरून कॉल केला आणि मला तुम्हाला भेटायचं आहे,असं ती म्हणाली. मग मी सुद्धा होकार दिला आणि आमची भेट घडली. सुरुवातीला त्यांना हा चित्रपट बनवायचा होता. पण, लॉकडाऊननंतर त्यांनी वेब सीरिज बनवण्याचा निर्णय घेतला."
पुढे गौरी सावंत म्हणाल्या,"मग मला निर्मात्यांनी सांगितलं, गौरी तुम्हाला माहिती आहे का तुमची भूमिका कोण साकारणार आहे? मला कोणीतरी मराठी कलाकार साकारत असेल. त्यानंतर त्यांनी ही भूमिका सुष्मिता साकारणार असल्याचं सांगितलं. मी म्हणाले, कोण सुष्मिता सेन. मग त्या म्हणाल्या, अरे, मिस वर्ल्ड, युनिव्हर्स तुमची भूमिका साकारणार आहे. त्यावर मी विचारलं, ती का माझी भूमिका करेल?"
अशी होती सुष्मिता सेनसोबत पहिली भेट
सुष्मिता सेनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगत श्रीगौरी सावंत म्हणाल्या,"मला सगळ्यांनी तिच्या घरी भेटण्यासाठी बोलावलं. कोणाच्या घरी जाताना आपण रिकाम्या हाती कसं जायचं, म्हणून मी पार्ल बिस्किट घेऊन गेले होते. तिथे गेल्यानंतर सुष्मिताने दरवाजा उघडला आणि मी बाचकले. मी १० मिनिटं तिच्याकडे बघतच राहिले पण तिने मला धीर दिला. मी तिला विचारलं तुम्ही माझी भूमिका का करणार आहात? त्यावर ती म्हणाली, 'कारण, तुम्ही एक आई आहात आणि मी देखील एक आई आहे.' तिच्या या उत्तराने माझं मन जिंकलं.तेव्हा ती म्हणाली, माझ्यासाठी काय आणलंय. मग मी तिला माझ्याकडेचा पार्ले बिस्किटचा पुडा आणि साडी दिली. म्हणाली, 'कसं खायचं? 'मी सांगितलं, पाण्यासोबत खा आणि मग तिने तसं केलं."
"मग ती मला बघायला यायची. मला ऑबझर्व करायची. सुरुवातीला मी दडपणाखाली होते आणि तिसऱ्या दिवसापासून मी नॉर्मल होते. ताली ही पहिली तृतीयपंथीयांवरची बायोपिक आहे. विश्वसुंदरीने मलाच नाही तर माझ्या समाजाला तो मान दिला आहे. ते धाडस तिने दाखवलं."अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.