'मिर्झापूर' चित्रपटाच्या शूटिंगला वाराणसीत सुरूवात; श्वेता त्रिपाठी म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:30 IST2025-10-08T18:28:33+5:302025-10-08T18:30:24+5:30
Mirzapur Web Series : २०१८ मध्ये सुरू झालेल्या 'मिर्झापूर' वेबसीरिजच्या कथानकाने सर्वांना इतके प्रभावित केले की, ही सीरिज अनेकांची फेव्हरेट' बनली. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत आणि तिन्ही सुपरहिट ठरले आहेत.

'मिर्झापूर' चित्रपटाच्या शूटिंगला वाराणसीत सुरूवात; श्वेता त्रिपाठी म्हणाली...
२०१८ मध्ये सुरू झालेल्या 'मिर्झापूर' (Mirzapur) वेबसीरिजच्या कथानकाने सर्वांना इतके प्रभावित केले की, ही सीरिज अनेकांची फेव्हरेट' बनली. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत आणि तिन्ही सुपरहिट ठरले आहेत. सीरिज हिट झाल्यानंतर आता 'मिर्झापूर' चित्रपट देखील बनत आहे, ज्याचे शूटिंग आता गोलू गुप्ता म्हणजेच श्वेता त्रिपाठीने सुरू केले आहे.
'मिर्झापूर' वेबसीरिजमध्ये गोलू गुप्ताची भूमिका अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने साकारली होती. त्यामुळे 'मिर्झापूर' चित्रपटातही गोलू एक महत्त्वाचा भाग आहे आणि गजगामिनीच्या भूमिकेत पुन्हा 'आग' लावण्यासाठी ती या चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी आली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण वाराणसी शहरात होत आहे. शूटिंग आणि आपल्या भूमिकेबद्दल बोलताना श्वेता त्रिपाठी म्हणाली, "गोलू माझ्यासाठी फक्त एक पात्र नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ती माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. आपला हा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहणे खरोखरच एक वेगळा अनुभव असेल."
''वाराणसी दुसऱ्या घरासारखं''
"वाराणसी माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखे आहे. हे शहर खास आहे, कारण माझे अनेक मोठे टप्पे याच शहराशी जोडलेले आहेत. 'मसान' पासून ते 'मिर्झापूर सिझन १' पर्यंत, या सर्वांनी मला अशा काही आठवणी दिल्या आहेत, ज्या मी कधीही विसरू शकत नाही. माझा ट्रेनर त्रिवेद पांडे, जो माझ्या मोठ्या भावासारखा आहे, तो देखील वाराणसीचा आहे. त्यामुळे हे शहर माझ्यासाठी अधिक खास ठरते. हे सुंदर शहर मला वारंवार इथे बोलवत राहते. इथले जेवण आणि इथले प्रेम सर्वकाही उत्कृष्ट आहे."
पुन्हा परतणार हे त्रिकूट
'मिर्झापूर'बद्दल बोलताना फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले होते, "'मिर्झापूर' हा एक मैलाचा दगड आहे. तीन सीझनच्या या सीरिजने स्वतःमध्येच एक नवीन स्थान प्राप्त केले आहे. कालीन भैया, गुड्डू भैया आणि मुन्ना भैया ही पात्रे लोकांच्या मनात घर करून गेली आहेत."