Farzi 2: "'फर्जी २' कधी येणार?", चाहत्याच्या प्रश्नाला शाहिद कपूरचं उत्तर, दिली मोठी हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:24 IST2026-02-21T11:22:34+5:302026-02-21T11:24:15+5:30
शाहिदला एका चाहत्याने 'फर्जी २'बद्दल विचारलं. 'फर्जी २' कधी येणार? असा प्रश्न चाहत्याने शाहिदला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना शाहिदने 'फर्जी २'बाबत मोठी हिंट दिली आहे.

Farzi 2: "'फर्जी २' कधी येणार?", चाहत्याच्या प्रश्नाला शाहिद कपूरचं उत्तर, दिली मोठी हिंट
ओटीटीवरील काही मोजक्या हिट इंडियन सीरिजपैकी एक ती म्हणजे शाहिद कपूरची 'फर्जी' ही वेब सीरिज. २०२३ मध्ये 'फर्जी' वेब सीरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सीरिजमधून बनावट नोटा छपाईवर आधारित ही सीरिज होती. प्रेक्षकांनाही ही सीरिज प्रचंड आवडली होती. तेव्हापासून चाहते 'फर्जी'च्या पुढच्या सीझनच्या प्रतिक्षेत होते. आता खुद्द शाहिद कपूरनेच 'फर्जी २'बाबत मोठी हिंट दिली आहे.
शाहिदने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत Ask Me सेशन घेतलं होतं. यामध्ये त्याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. शाहिदला एका चाहत्याने 'फर्जी २'बद्दल विचारलं. 'फर्जी २' कधी येणार? असा प्रश्न चाहत्याने शाहिदला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना शाहिदने 'फर्जी २'बाबत मोठी हिंट दिली आहे. शाहिदने चाहत्याला रिलीज डेटच सांगून टाकली. तो म्हणाला 'पुढच्या शुक्रवारी...". काही दिवसांपूर्वीच शाहिदने 'फर्जी २'बाबत पोस्ट केली होती. तब्बल ३ वर्षांनी 'फर्जी'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दरम्यान, शाहिदचा 'ओ रोमिओ' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमालाही चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. 'ओ रोमिओ'नंतर आता चाहते शाहिदला 'फर्जी २'मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.