Video: मराठमोळ्या सई ताम्हणकरसोबत दिसला विजय वर्मा, अभिनेत्रीकडे हात दाखवत दिली खास पोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:00 IST2026-04-07T17:00:10+5:302026-04-07T17:00:45+5:30
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि साऊथ अभिनेता विजय वर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे एकत्र पापाराझींना पोझ देताना दिसत आहे.

Video: मराठमोळ्या सई ताम्हणकरसोबत दिसला विजय वर्मा, अभिनेत्रीकडे हात दाखवत दिली खास पोज
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि साऊथ अभिनेता विजय वर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे एकत्र पापाराझींना पोझ देताना दिसत आहे. सई ताम्हणकरकडे बघून विजय वर्मा फोटोसाठी खास पोझही देत आहे. 'मटका किंग' या वेब सीरिजच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमधील हा व्हिडीओ आहे. या इव्हेंटसाठी विजय वर्माने खास लूक केला होता. तर सई निळ्या रंगाच्या साडीत दिसून आली.
विजय वर्माला मराठमोळ्या सईसोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'मटका किंग' या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये त्याने ब्रिज भट्टी ही भूमिका साकारली आहे. तर सई ताम्हणकर बरखा या त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. 'मटका किंग'च्या ट्रेलरमध्ये सई आणि विजय वर्माची झलक पाहायला मिळाली. या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा आणि सईने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.
'मटका किंग'चं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती नागराज मंजुळे यांनी केली आहे. येत्या १७ एप्रिलपासून ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित केली जाणार आहे. ‘मटका किंग’मध्ये विजय वर्मा प्रमुख भूमिकेत असून कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादावत आणि गुलशन ग्रोवरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय भारत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.