कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:31 IST2025-09-22T16:30:47+5:302025-09-22T16:31:30+5:30
बॅड्स ऑफ बॉलिवूडमधल्या 'त्या' सीनवर खळखळून हसतायेत प्रेक्षक

कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
शहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड'वेबसीरिजची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या सीरिजने तरुणाईला प्रेमातच पाडलं आहे. लक्ष्य लालवानी आणि राघव जुयाल सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. राघव स्क्रीनवर येताच प्रेक्षक खळखळून हसत आहे. तसंच इमरान हाश्मीचा कॅमिओ सीरिजमध्ये भाव खाऊन जातोय. 'अख्खा बॉलिवूड एक तरफ और इमरान हाश्मी एक तरफ'हा राघवचा डायलॉगही गाजतोय. इमरानसमोर 'कहो ना कहो' हे गाणं गातानाच्या सीनमध्ये खरोखरंच डोळ्यात पाणी आल्याचा खुलासा आता राघवने केला आहे.
एका मुलाखतीत राघव जुयाल म्हणाला, "हा सीन प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला आणि आर्यनलाही खात्री होती. या सीनसाठी मी खूप मेहनत केली आणि यात काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न केला. मला यात मजाही आली. फायनल शूटवेळी इमरान हाश्मी आला आणि तो सीन झाला. सीन करताना खरोखरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. असाच तो सीन शूट झाला. मी हा सीन अगदी मनापासून केला होता."
आता त्या सीनवर प्रेक्षक अक्षरश: उड्या मारत आहेत. शिट्ट्या वाजवत आहेत. इमरान हाश्मीचा वेगळा चाहतावर्ग आहे. या सीरिजमध्ये इमरानला जणू एक ट्रिब्युटच देण्यात आला आहे. शिवाय सीरिजमध्ये कॅमिओंचा पाऊसच पडला आहे. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, राजामौली, अर्शद वारसी, रणबीर कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान, दिशा पाटनी, शनाया कपूरसह अनेक जणांनी कॅमिओ केला आहे.