'शांतीत क्रांती 2' मध्ये प्रियदर्शनी इंदलकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 19:24 IST2023-09-27T19:22:24+5:302023-09-27T19:24:15+5:30

Shantit kranti: प्रियदर्शनीसोबत या सीरिजमध्ये अभिनेत्री प्रिया बॅनर्जीदेखील दिसणार आहे.

Priyadarshini Indalkar's entry in 'Shanti Kranti 2'; Will play 'this' role | 'शांतीत क्रांती 2' मध्ये प्रियदर्शनी इंदलकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

'शांतीत क्रांती 2' मध्ये प्रियदर्शनी इंदलकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

मराठी ओरिजिनल सिरीज 'शांतीत क्रांती'ला मिळालेल्या अपाय यशानंतर या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कधी प्रेक्षकांना हसवणारी, कधी आपलीशी वाटणारी तर कधी प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना एका नवा प्रवास पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे यावेळी या सीरिजमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर आणि प्रिया बॅनर्जी या दोन दिग्गज अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे आता या सीरिजची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहेत.

या नव्या सीझनमध्‍ये प्रियदर्शिनी इंदलकर समृद्धी ही भूमिका साकारणार आहे. समृद्धीचं श्रेयससोबत अरेंजमॅरेज झालं असून या नात्यातील गुंता ती कशाप्रकारे सोडवते हे या सीरिजमध्ये दिसणार आहे. तर, दुसरीकडे प्रिया बॅनर्जी, सॅन फ्रॅन्सिस्कोमधील कनी या एनआरआय मुलीची भूमिका साकारणार आहे.

''मला समृद्धीच्‍या भूमिकेबाबत सांगण्‍यात आले तेव्‍हा मी लगेच या भूमिकेसाठी होकार दिला. समृद्धी एक प्रामाणिक मुलगी असून जिचा नात्यातील खरेपणावर विश्वास आहे. या सीरिजच्या माध्यमातून तिची प्रेमाची ताकद दिसून येणार आहे. त्यामुळे या सीरिजमधील माझी भूमिका आणि श्रेयससोबत असलेलं समृद्धीचं नात प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे, असं प्रियदर्शिनी म्हणाली.

दरम्यान, भाडीपासोबत सहयोगाने टीव्‍हीएफद्वारे निर्मित आणि अरूनभ कुमार यांची निर्मिती असलेल्‍या या सिरीजचे दिग्‍दर्शक सारंग साठ्ये व पॉला मॅकग्लिन आहेत. या सिरीजमध्ये अभय महाजन, अलोक राजवाडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसंच ही सीरिज येत्या १३ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Web Title: Priyadarshini Indalkar's entry in 'Shanti Kranti 2'; Will play 'this' role