'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:30 IST2025-07-08T17:30:01+5:302025-07-08T17:30:46+5:30
विवाहबाह्य संबंधातून अभिनेत्याला १४ वर्षांचा मुलगा, स्वत:च केलेला खुलासा; या अभिनेत्याच्या पत्नीसोबत लिव्ह इन मध्ये राहतात प्रधानजी

'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
'पंचायत'चे प्रधानजी म्हणजेच अभिनेते रघुबीर यादव (Raghubir Yadav) अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहेत. गाजलेल्या 'लगान' सिनेमातही ते दिसले होते. 'पीपली लाईव्ह', 'सलाम बॉम्बे', '१९४२ अ लव्ह स्टोरी', 'अशोक' अशा अनेक दमदार सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं. प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचलेले रघुबीर यादव यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं. स्वत: विवाहित असतानाही एका अभिनेत्याच्या पत्नीसोबत त्यांचं अफेअर होतं. तसंच त्याआधीही ते एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होते.
रघुबीर यादव यांचं पहिलं लग्न कथ्थक डान्सर पूर्णिमा खरगासोबत झालं होतं. रघुबीर यांच्या संघर्षाच्या काळात पूर्णिमा यांनी त्यांना साथ दिली होती. मात्र यश मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला सोडल्याचा दावा पूर्णिमा यांनी केला. इतकंच नाही तर रघुबीर आणि प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता दास यांचंही अफेअर होतं असाही खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता.
संजय मिश्रा यांच्या पत्नीसोबत अफेअर
रघुबीर यादव पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर एका इमारतीत राहत होते. तिथेच अभिनेते संजय मिश्रा त्यांची पत्नी रोशनी अचरेजा सोबत राहत होते. त्यांच्यात मैत्री झाली. मात्र रोशनीशी रघुबीर यांची जवळीक वाढली. ते प्रेमात पडले. फिजीकल रिलेशनशिपमध्येही आले. दरम्यान रोशनी गरोदर राहिली. यानंतर तिने संजय मिश्रा यांना घटस्फोट दिला आणि ती रघुबीर यांच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहायला लागली. दोघांना १४ वर्षांचा मुलगा असल्याचा खुलासा रघुबीर यांनी कोर्टात केला होता. यानंतर रघुबीर यांची पहिली पत्नी पूर्णपणे खचली. तिने रघुबीर यांच्याकडून १० कोटींची नुकसानभरपाई आणि दर महिना १ लाख पोटगीची मागणी केली. मात्र आता त्यांना ४० हजार रुपये भत्ता मिळतो तोही वेळेवर मिळत नाही. यामुळे रघुबीर यांना एकदा तुरुंगवासही भोगावा लागला होता.