Panchayat 5: प्रतीक्षा संपली! 'पंचायत ५'च्या शूटिंगला सुरुवात, 'या' महिन्यात रिलीज होणार वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:25 IST2026-04-03T13:23:11+5:302026-04-03T13:25:25+5:30

'पंचायत'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची घोषणा झाली असून सेटवरील शूटिंगचे फोटो समोर आले आहेत.

Panchayat 5 release date shooting photos viral jitendra kumar sanvika neena gupta | Panchayat 5: प्रतीक्षा संपली! 'पंचायत ५'च्या शूटिंगला सुरुवात, 'या' महिन्यात रिलीज होणार वेबसीरिज

Panchayat 5: प्रतीक्षा संपली! 'पंचायत ५'च्या शूटिंगला सुरुवात, 'या' महिन्यात रिलीज होणार वेबसीरिज

'पंचायत' वेबसीरिज चांगलीच गाजली. 'पंचायत' वेबसीरिजचे चारही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. साधंसुधं कथानक, हलकेफुलके विनोद आणि भावनिकतेचा धागा पकडून फुलत जाणारे एपिसोड यामुळे 'पंचायत' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली. आता सर्वांना 'पंचायत'च्या पाचव्या सीझनची उत्सुकता आहे. अशातच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. 'पंचायत'च्या पाचव्या सीझनची घोषणा झाली असून सेटवरील शूटिंगचे फोटो समोर आले आहेत.

द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी केली आहे. कथा लेखन चंदन कुमार यांचे असून दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. पाचव्या सीझनमध्ये ‘पंचायत’ची लोकप्रिय कलाकारांची टीम पुन्हा दिसणार आहे. विशेष म्हणजे, ३ एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पंचायत’च्या पहिल्या सीझनला आज सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त प्राईम व्हिडीओने 'पंचायत ५' च्या शूटिंगचे फोटो समोर आणले असून प्रेक्षकांना पाचव्या सीझनबद्दल गुड न्यूज दिली आहे.


चौथ्या सीझनच्या शेवटी चाहत्यांना फुलेरातील राजकारण बघायला मिळाले. मागील पर्व जिथे संपले होते त्यात दिसलं की, मंजू देवी पंचायत निवडणुकीतील पराभवातून सावरत होत्या आणि प्रधानजी या निकालाने हादरले होते. पाचवा सीझन या तणावपूर्ण टप्प्यापासून पुढे सुरू होणार असून फुलेरा गावातील विनोद, नाट्य आणि भावनिक क्षणांसह अनेक नवीन वळणे पाहायला मिळतील. समोर आलेल्या फोटोंमध्ये सचिवजी, प्रल्हाद, मंजू देवी, भूषण, बिनोद, रिंकी ही पात्र धमाल करताना दिसत आहेत. 

या सीझनमध्ये पुन्हा एकदा जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सांविका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा हे लोकप्रिय कलाकार पुन्हा एकत्र दिसणार आहेत. गेल्या वर्षीच 'पंचायत ५'ची घोषणा झाली होती. त्यानुसार जून २०२६ मध्ये 'पंचायत ५' रिलीज होईल अशी शक्यता आहे. पुन्हा एकदा प्राईम व्हिडीओवर 'पंचायत ५' लोकांना बघता येईल.

Web Title : पंचायत सीजन 5: शूटिंग शुरू, जल्द ही रिलीज होने की उम्मीद

Web Summary : लोकप्रिय वेब सीरीज 'पंचायत' वापस आ गई है! सीजन 5 की शूटिंग शुरू हो गई है, जिससे प्रशंसकों में उत्साह है। नए सीजन में परिचित कलाकार, हास्य और नाटक की उम्मीद है, जो संभवतः जून 2026 में प्राइम वीडियो पर रिलीज होगी। कहानी सीजन 4 की राजनीतिक घटनाओं के बाद शुरू होती है।

Web Title : Panchayat Season 5: Shooting Begins, Release Date Expected Soon

Web Summary : The popular web series 'Panchayat' is back! Season 5 shooting has commenced, raising excitement among fans. Expect the familiar cast, humor, and drama in the new season, likely releasing in June 2026 on Prime Video. The story picks up after the political events of season 4.