"तुमची आई निवडणूक हरली, आता पुढे काय?" रिंकीने एका वाक्यात उत्तर देऊन सर्वांची बोलती केली बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:28 IST2025-07-08T11:28:03+5:302025-07-08T11:28:20+5:30
पंचायत ४ मध्ये मंजू देवी निवडणूक हरल्याने सर्वांना धक्का बसला. यावर सीरिजमधल्या रिंकीने खास उत्तर देऊन सर्वांची बोलती बंद केली आहे

"तुमची आई निवडणूक हरली, आता पुढे काय?" रिंकीने एका वाक्यात उत्तर देऊन सर्वांची बोलती केली बंद
अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेली लोकप्रिय वेबसीरिज ‘पंचायत’ सिझन ४ ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या वेबसीरिजमध्ये शेवटी दिसतं की, मंजू देवी (नीना गुप्ता) या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यामुळे सर्वांना धक्का बसला. याविषयी मंजू देवीच्या मुलीची भूमिका करणाऱ्या सानविकाने (रिंकी) एअरपोर्टवर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. त्यामुळं 'पंचायत'च्या पुढील सीझनमध्ये अर्थात 'पंचायत ५'मध्ये मजा येणार यात शंका नाही.
रिंकी काय म्हणाली?
सानविका नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. तिला एका फोटोग्राफरने विचारलं, “तुमची आई निवडणूक हरली, आता?” त्यावर सानविका हसली आणि म्हणाली, “त्याचा बदला आम्ही जरुर घेऊ” म्हणजेच 'पंचायत ५'मध्ये सर्व मिळून क्रांती देवी आणि बनराकसचा बदला घेणार, हे उघड आहे. हा छोटासा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, प्रेक्षकांनी तिच्या या प्रतिक्रियेवर आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी पुढे कमेंट करत विचारलं की, "रिंकी आणि सचिवजीचं पुढे काय होणार?", "सीझन ५ मध्ये काय पाहायला मिळणार?" अशी उत्सुकता व्यक्त केली.
'पंचायत ५'ची उत्सुकता
'पंचायत'च्या चौथ्या सिझनमध्ये मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यात ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली होती. त्यात मंजू देवींचा पराभव झाला होता, आणि अनेक प्रेक्षक त्यावर नाराज होते. अशातच काल प्राईम व्हिडीओने नुकतीच 'पंचायत ५'ची घोषणा केली. इतकंच नव्हे 'पंचायत ५'च्या रिलीजची घोषणाही झाली. पुढील वर्षी अर्थात २०२६ ला 'पंचायत ५' रिलीज होणार आहे. त्यामुळे पुढील सीझनमध्ये काय बघायला मिळणार, यासाछी प्रेक्षकांना २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.