नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 04:59 PM2024-03-19T16:59:04+5:302024-03-19T16:59:33+5:30

नागराज मंजुळेंच्या पहिल्या वेबसिरीजची घोषणा, हिंदीतील हा लोकप्रिय अभिनेता झळकणार

Nagraj Manjule first web series matka king starring vijay varma in lead role ratan khatri | नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत

नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत

हिंदी - मराठी इंडस्ट्री गाजवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे नागराज मंजुळे.नागराज मंजुळे यांनी 'फँड्री', 'सैराट' अशा लोकप्रिय सिनेमांमधून मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला  'झुंड' सिनेमा दिग्दर्शित करुन बॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली. नागराज यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा नुकतीच झाली असून नागराज त्यांची पहिली हिंदी वेबसिरीज घेऊन येत आहेत. तिचं नाव 'मटका किंग'. 

आज अॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मच्या आगामी सिरीजची घोषणा करण्यात आली. यातील महत्वाची सिरीज म्हणजे नागराज मंजुळे यांची 'मटका किंग'. गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रोजेक्टची उत्सुकता होती. अखेर आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 'मटका किंग' मध्ये बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विजय वर्मा प्रमुख भूमिका साकारणार आहे. मटका किंग रतन खत्रीच्या आयुष्यावर ही वेबसिरीज आधारीत  आहे.

आज मुंबईत करण जोहरच्या उपस्थितीत 'मटका किंग' ची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते. वेबसिरीजमधला प्रमुख कलाकार विजय वर्मा आणि निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरही यावेळी उपस्थित होते. नागराज मंजुळे सध्या त्यांच्या 'खाशाबा' या मराठी सिनेमाच्या शुटींगमध्येही व्यस्त असून लवकरच ते 'मटका किंग'च्या शुटींगला सुरुवात करतील

Web Title: Nagraj Manjule first web series matka king starring vijay varma in lead role ratan khatri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.