मिहिर गोडबोलेची 'लंपन' वेबसीरिजसाठी अशी झाली निवड, दिग्दर्शक म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 05:08 PM2024-05-17T17:08:25+5:302024-05-17T17:09:11+5:30

Lampan Web Series : निपुण धर्माधिकारी दिग्‍दर्शित 'लंपन' वेबसीरिज १६ मे रोजी भेटीला येणार आहे.

Mihir Godbole was selected for 'Lampan' web series, director said... | मिहिर गोडबोलेची 'लंपन' वेबसीरिजसाठी अशी झाली निवड, दिग्दर्शक म्हणाला...

मिहिर गोडबोलेची 'लंपन' वेबसीरिजसाठी अशी झाली निवड, दिग्दर्शक म्हणाला...

सोनी लिव्‍हवरील मराठी ओरिजिनल सीरिज ‘लंपन' (Lampan Web Series) १६ मे रोजी प्रदर्शित होण्‍यासाठी सज्‍ज झाली आहे. ही सिरीज प्रेक्षकांना प्रेमळ लंपनची ओळख करून देते. लंपनची भूमिका बालकलाकार मिहिर गोडबोले(Mihir Godbole)ने साकारली आहे. पण लक्षवेधक बाब म्‍हणजे मिहिरला त्‍याच्‍या दातांमुळे ही भूमिका मिळाली आहे. याबाबतचा खुलासा नुकताच झाला. 

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाला, “दिग्‍दर्शकाच्‍या दृष्टिकोनतून कास्टिंग म्‍हणजे फक्‍त कलाकाराचा शोध घेणे नाही, तर त्‍या कलाकारामध्‍ये भूमिकेची संपूर्ण विशिष्‍टता असणे आवश्‍यक आहे. लंपनचा प्रवास याबाबतीत अपवाद नव्‍हता. प्रत्‍येक बारीक-सारीक गोष्‍टींना महत्त्व देण्‍यात आले आणि आम्‍ही त्‍यासाठी आमचा वेळ घेतला. मी पहिल्‍यांदा मिहिरला भेटलो तेव्‍हा त्‍याच्‍या हास्‍याने माझे लक्ष वेधून घेतले. त्‍यामध्‍ये नैसर्गिक प्रामाणिकपणा व उत्‍साही वृत्ती समाविष्‍ट होती, जे लंपनच्‍या वृत्तीशी परिपूर्णपणे जुळले. 

तो पुढे म्हणाला की, आमची लंपनसाठी योग्‍य कलाकाराची निवड करण्‍याची इच्‍छा होती, ज्‍यामुळे मिहिरचे हास्‍य फक्‍त लक्षवेधक नव्‍हते तर त्‍यामध्‍ये निरागसता व अद्भुतता सामावलेली होती, जे आम्‍हाला या भूमिकेच्‍या माध्‍यमातून दाखवायचे होते. मिहिरचे हास्‍य त्‍याच्‍या अविश्‍वसनीय टॅलेंट्ससह लंपनला प्रकाशझोतात आणेल या विश्‍वासासह मिहिरची निवड होणे स्‍वाभाविक होते. मिहिरच्‍या दातांबाबतची ही गाथा आठवण करून देते की, मनोरंजन विश्‍वामध्‍ये हास्यासारख्‍या सर्वात अनपेक्षित गोष्‍टींमध्‍ये देखील उत्‍साहपूर्ण आनंद मिळू शकतो.   

निपुण धर्माधिकारी दिग्‍दर्शित आणि श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे व अमित पटवर्धन यांसारख्‍या प्रतिभावान टीमद्वारे निर्मित सिरीज ‘लंपन' मराठी साहित्‍याच्‍या प्रवासावर घेऊन जाण्‍याची खात्री देते. 

Web Title: Mihir Godbole was selected for 'Lampan' web series, director said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.