मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधव झळकली 'जोकर' हिंदी वेबसीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 19:02 IST2022-06-14T19:01:22+5:302022-06-14T19:02:11+5:30

Tejashree Jadhav: दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधव 'द जोकर: अ स्ट्रेंज किडनेपर' या हिंदी सिरीजमधून भेटीला आली आहे.

Marathmoli actress Tejashree Jadhav starred in 'Joker' Hindi webseries | मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधव झळकली 'जोकर' हिंदी वेबसीरिजमध्ये

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधव झळकली 'जोकर' हिंदी वेबसीरिजमध्ये

दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी मराठमोळी मुलगी तेजश्री जाधव (Tejashree Jadhav) सध्या एमएक्स प्लेअर वरील 'द जोकर: अ स्ट्रेंज किडनेपर' या हिंदी सिरीजमधून झळकत आहे. 'अट्टी' या तामिळ फिल्म नंतर ती 'अकीरा', 'माधुरी टॉकीज' ह्या हिंदी सीरिजमध्ये देखील दिसून आली होती. 

तेजश्रीने माटुंग्याच्या रूईया कॉलेजमधून प्रयोगिक नाटकाचे धडे गिरवले असून, मराठी रंगमंचानेच माझ्यात अभिनयाचे पैलू पाडले असल्याचं ती सांगते. नेहमी ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये दिसणारी तेजश्री जोकरमध्ये वेगळ्या व्यक्तीरेखेत दिसून येणार आहे. यात ती हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेता हितेन तेजवानी सोबत झळकणार आहे. तसेच, यात मंगेश देसाई एका वेगळ्या भूमिकेत दिसून येत आहेत. या सीरिजचा पोस्टर पाहता मंगेश देसाई सीक्रेट खलनायकाच्या व्यक्तीरेखेत दिसून येतात. मंगेश सरांची काम करण्याची पद्धत आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले असल्याचे तेजश्री सांगते. त्यांनी आजवर ज्या भूमिका केल्या आहेत, त्याला तोड नाही, ते ज्या पद्धतीने भुमिकेत स्वतःला वाहून घेतात ते शब्दात सांगता येणार नाही, त्यांच्या सोबत मला स्क्रीन शेअर करायला मिळाली हे माझे भाग्य असल्याचे तेजश्री सांगते.


मराठीत कधी काम करणार याबद्दल विचारले असता लवकरच, शोध सुरू आहे असे ती म्हणते. 'खरं तर मराठीत काम करण्याचं पक्क झालं होतं, अगदी एका ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली होती, मात्र, ऐन लॉकडाऊनमुळे तो प्रोजेक्ट पुर्ण होऊ शकला नाही, आणि यामुळे तेजश्रीचे मराठीतले पदार्पण लांबले.

'ज्या भाषेने घडवले, ज्या भाषेत अभिनयाचे बारकावे टिपले, त्या मराठी सोबत माझे ऋणानुबंध जोडले आहेत. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल मराठीत पुनःश्च हरी ओम करणारच!' असे आश्वासन तिने दिले.

Web Title: Marathmoli actress Tejashree Jadhav starred in 'Joker' Hindi webseries