मनोज वाजपेयींचा बहुचर्चित 'जोरम' ओटीटीवर रिलीज, मराठी अभिनेत्रीही आहे मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 03:53 PM2024-02-02T15:53:34+5:302024-02-02T15:54:40+5:30

सिनेमाला यंदाचा फिल्मफेअर 'बेस्ट फिल्म क्रिटिक्स' अवॉर्डही मिळाला.

Manoj Bajpayee s Joram Movie released on OTT won best film critics award at filmfare | मनोज वाजपेयींचा बहुचर्चित 'जोरम' ओटीटीवर रिलीज, मराठी अभिनेत्रीही आहे मुख्य भूमिकेत

मनोज वाजपेयींचा बहुचर्चित 'जोरम' ओटीटीवर रिलीज, मराठी अभिनेत्रीही आहे मुख्य भूमिकेत

या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं असा प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी एक नवीन कंटेंट आला आहे. वीकेंडला घरबसल्या थ्रिलर सिनेमाचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिभाशाली अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee)  यांचा बहुचर्चित 'जोरम' सिनेमा नुकताच ओटीटीवर आला आहे.मनोज वाजपेयींच्या चाहत्यांसाठी तर ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

मनोज वाजपेयी यांचा 'जोरम' हिंदी सिनेमा 8 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. Animal आणि सॅम बहादुर या दोन तगड्या बिग बजेटमध्ये सिनेमांच्या गर्दीत 'जोरम'कडे प्रेक्षकांनी फारसं लक्ष दिलं नाही. मात्र क्रिटिक्सने सिनेमाचं खूप कौतुक केलं. ज्याने कोणी हा सिनेमा पाहिला सर्वांनीच स्तुती केली. आता हा सिनेमा ओटीटीवरही आला आहे. Amazon Prime वर सिनेमा रिलीज झाला असून या वीकेंडला नक्कीच तुम्ही हा सिनेमा पाहू शकाल. मनोज वाजपेयी यांनी स्वत: पोस्ट शेअर करत लिहिले, 'तुमची आवडती सर्व्हायवल थ्रिलर आता अमेझॉन प्राईमवर आली आहे.'

मनोज वाजपेयी यांच्या 'जोरम' ला यंदाच्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट फिल्म क्रिटिक्स' हा अवॉर्ड मिळाला. ही एका वडिलांची कहाणी आहे जे जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलीला घेऊन पळतात. गाव सोडून ते पत्नी आणि लेकीसह शहरात येतात. मात्र त्यांचा भूतकाळ त्यांचा पाठपुरावा सोडत नाही. त्यांच्या पत्नीचं निधन होतं. लेकीचा आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ते भटकत राहतात. 

या सिनेमात मनोज वाजपेयीसोबत अभिनेत्री स्मिता तांबे, राजश्री देशपांडे, मोहम्मद झिशान अयुब आणि तनिष्ठा चॅटर्जी मुख्य भूमिकेत आहेत. देवाशीष मखिजा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

 

 

Web Title: Manoj Bajpayee s Joram Movie released on OTT won best film critics award at filmfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.