रहस्यमयरीत्या मुले गायब होतात अन्...; १ तास ५२ मिनिटांच्या 'या' सिनेमातील सस्पेन्स पाहून थक्क व्हाल! कधी, कुठे पाहाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:15 IST2025-12-01T14:12:48+5:302025-12-01T14:15:30+5:30
जबरदस्त थ्रिलर अन् रहस्यमय कथानक असलेला 'हा सिनेमा ओटीटीवर होतोय ट्रेंड, तुम्ही पाहिलात?

रहस्यमयरीत्या मुले गायब होतात अन्...; १ तास ५२ मिनिटांच्या 'या' सिनेमातील सस्पेन्स पाहून थक्क व्हाल! कधी, कुठे पाहाल?
OTT Cinema: अनेकांना ओटीटीवर नवीनवीन चित्रपट पाहायला मिळतात. यापैकी काही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज केल्यानंतर ओटीटीवर रिलीज केले जातात. तर काही चित्रपट हे थेट ओटीटीवर रिलीज केले जातात. असाच एक चित्रपट सध्या ट्रेंडिंग आहे.नेटफ्लिक्सवरील या हॉरर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगली दाद मिळते आहे. या चित्रपटाचं नाव बारामुल्ला आहे. आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित बारामुल्ला हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ ला प्रदर्शित झाला. अभिनेता मानव कौलची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.
कथानक
या चित्रपटाची कथा काश्मीरमधील बारामुल्ला येथून सुरू होते. या सिनेमात एका आमदाराचा मुलगा अचानक एका कार्यक्रमातून गायब होतो.त्यानंतर बारामुल्लामधील लहान मुलं रहस्यमय पद्धतीने गायब होऊ लागतात. काश्मीर खोऱ्यातील मुलांचं अपहरण करून त्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी बनवण्याच्या मुद्द्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीएसपी रिदवान सय्यद त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह बारामुल्ला येथे पोहोचतात. अखेर तपासात एक विचित्र घटना उघडकीस येते तेव्हा कथेला एक मोठं वळण येतं.
'बारामुल्ला' हा एक सुपरनॅच्युरल मिस्ट्री थ्रिलर आहे, ज्याची कथा काश्मीरमधल्या बारामुल्ला याठिकाणी घडताना दाखवली आहे.या चित्रपटात मानव कौल सोबत भाषा सुंबळी, अरिस्ता मेहता, रोहन सिंग, विकास शुक्ला, प्रियांक तातारिया आणि संजय सुरी यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. १ तास ५२ मिनिटांचा हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहताना तुम्ही जागेवरून हलणार नाही.