५८ वर्षांची 'ही' बॉलिवूड अभिनेत्री ‘स्ट्रेंजर थिंग्स-५’ वर पडली भारी! ओटीटीवर ट्रेंडिंग आहे सीरिज, तुम्ही बघितली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 15:39 IST2026-01-04T15:10:56+5:302026-01-04T15:39:39+5:30
हल्ली ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरच्या सीरिज पाहायला मिळतात. सध्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’ ची चलती असताना एका नव्याकोऱ्या सीरिजने व्ह्यूअरशिपमध्ये मात दिली आहे.

५८ वर्षांची 'ही' बॉलिवूड अभिनेत्री ‘स्ट्रेंजर थिंग्स-५’ वर पडली भारी! ओटीटीवर ट्रेंडिंग आहे सीरिज, तुम्ही बघितली?
Ott Series: हल्ली ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरच्या सीरिज पाहायला मिळतात. मात्र, मागच्या काही काळापासून ओटीटीवर क्राइम थ्रिलर, सस्पेन्स थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपटांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. थरारक कथानक असलेले चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. सध्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’ ची चलती असताना एका नव्याकोऱ्या सीरिजने व्ह्यूअरशिपमध्ये मात दिली आहे. या नवीन वेब सीरिजला ओटीटी प्रेमींचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, या बहुचर्चित वेब सीरिजचं नाव मिसेस देशपांडे आहे. रहस्य, थरार आणि गुढ कथा असलेली ही सीरिज आणि १९ डिसेंबर २०२५ रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. या सीरिजच्या प्रत्येक दृश्यात नवीन ट्विस्ट समोर येतात, ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही.यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित नकारात्मक भूमिका साकारत आहे.तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.व्ह्यूअरशिपच्या बाबतीत मिसेस देशपांडे ही सीरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’वर भारी पडली आहे.
'ऑरमॅक्स मीडिया'ने २२ ते २८ डिसेंबर या आठवड्याचा भारतातील ओटीटी व्ह्यूअरशिपचा डेटा शेअर केला आहे.माधुरी दीक्षितची ही नवी सीरिज या यादीत अव्वल स्थानावर आहे. तर'स्ट्रेंजर थिंग्ज सीझन ५ दुसऱ्या स्थानावर आहे. शिवाय, जागतिक स्तरावर, 'स्ट्रेंजर थिंग्ज'ने ३० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवून माधुरीच्या शोला मागे टाकले.