पुन्हा रंगला वकिलांचा ड्रामा! रवी किशनची 'मामला लीगल है २' कुठे बघता येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:48 IST2026-04-03T16:46:34+5:302026-04-03T16:48:22+5:30
सध्या कोर्टरूम ड्रामा या जॉनरचे चित्रपट आणि वेबसीरिजची क्रेझ वाढली आहे.

पुन्हा रंगला वकिलांचा ड्रामा! रवी किशनची 'मामला लीगल है २' कुठे बघता येणार?
Maamla Legal Hai 2 : कॉमेडी, थ्रिलर, रोमँटिक, ऐतिहासिक अशा विविध जॉनरचे चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात आणि प्रत्येक जॉनरचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. ओटीटी आल्यामुळे क्राइम-थ्रिलर आणि सस्पेन्स, कोर्टरूम ड्रामा या जॉनरचे चित्रपट आणि वेबसीरिजची क्रेझ वाढली आहे. अशीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली कोर्टरूम कॉमेडी सीरिज 'मामला लीगल है' प्रचंड गाजली. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'मामला लीगल है २' ही सीरिज ३ एप्रिल म्हणजे आजपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाली आहे. या सीरिजमध्ये दिल्लीतील पटपडगंज परिसरातील न्यायालयाची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेते रवी किशन यांनी सीरिजमध्ये वीडी त्यागी नावाच्या वकिलाची भूमिका साकारली आहे. जे आता दुसऱ्या सीझनमध्ये न्यायाधीश झाले आहेत आणि त्यांच्यासमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.
'मामला लीगल है २' या सीरिजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात दाखवण्यात येणारे अजब-गजब कायदेशीर खटले हे खऱ्या आयुष्यातील घटनांवरून प्रेरित आहेत. या सीरिजचं दिग्दर्शन राहुल पांडे यांनी केलं आहे. पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता, त्यामुळे दुसऱ्या सीझनकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.