सर्वांसाठी जीतू भैयाच! सर का नाही..?; 'कोटा फॅक्टरी 3' चा खास टिझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 14:15 IST2024-03-01T14:13:41+5:302024-03-01T14:15:27+5:30

'कोटा फॅक्टरी 3' चा उत्कंठावर्धक टिझर एकदा बघाच

Kota Factory 3 teaser video starring jitendra kumar mayur more | सर्वांसाठी जीतू भैयाच! सर का नाही..?; 'कोटा फॅक्टरी 3' चा खास टिझर

सर्वांसाठी जीतू भैयाच! सर का नाही..?; 'कोटा फॅक्टरी 3' चा खास टिझर

काल नेटफ्लिक्सने त्यांच्या आगामी सिनेमा आणि वेबसिरीजची घोषणा केली. याृमध्ये विविध विषयांवरच्या नवनवीन वेबसिरीज आणि सिनेमे पाहायला मिळत आहेत. यामधील सर्वात महत्वाची घोषणा काल झाली. ती पाहून लोकांना खुपच आनंद झाला. ती म्हणजे 'कोटा फॅक्टरी सीझन 3'. सर्वांचा लाडका अभिनेता जितेंंद्र कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसिरीजचा तिसरा सीझन लवकरच भेटीला येणार आहे.

'कोटा फॅक्टरी सीझन 3' ची काल घोषणा झाली. यावेळी वैभव, बालमुकुंद आणि उदय हे तिघे JEE देण्याच्या तयारीत आहेत. त्यांना मार्गदर्शन करायला जीतू भैया सज्ज आहेत. "जीत की तैयारी नही तैयारी ही जीत है भाई", अशा अर्थपुर्ण संवादांनी 'कोटा फॅक्टरी सीझन 3' चा टिझर सजलेला दिसतोय. पण टीझर पाहून कळतं की जीतू भैयाच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं दिसतं, ज्यामुळे तो शांत झालाय. 

टिझरच्या शेवटी दिसतं की.. एक वरिष्ठ महिला त्याला विचारतात.. जीतू भैयाच का? सर का नाही?.. 'कोटा फॅक्टरी सीझन 3' च्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा सकस मनोरंजनाची मेजवानी मिळणार यात शंका नाही. अजुन 'कोटा फॅक्टरी सीझन 3' ची रिलीज डेट समोर आली नाही तरीही आधीच्या दोन सीझनप्रमाणे 'कोटा फॅक्टरी सीझन 3' ला प्रेक्षकांचं प्रेम मिळेल, यात शंका नाही.

Web Title: Kota Factory 3 teaser video starring jitendra kumar mayur more