बॉक्स ऑफिसवर गाजवल्यानंतर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 12:13 PM2023-09-22T12:13:05+5:302023-09-22T12:13:45+5:30

Rocky Aur Rani Ki Prem Kahani OTT : आता 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.  

karan johar rocky aur rani ki prem kahani released on amazon prime ott platform | बॉक्स ऑफिसवर गाजवल्यानंतर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

बॉक्स ऑफिसवर गाजवल्यानंतर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

googlenewsNext

आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असलेला 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' हा चित्रपट २८ जुलैला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. करण जोहरचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.  

थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यांनी 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट नुकताच अ‍ॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर हा चित्रपट चाहत्यांना पाहता येणार आहे. 

'रॉकी और रानी की प्रेमकहानी' चित्रपटात आलिया आणि रणवीरसह धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मराठी अभिनेत्री क्षिती जोगही या चित्रपटात झळकली आहे. कित्येक वर्षांनंतर करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. १६० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३०० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटातील गाण्यांनाही पसंती मिळाली होती. 

Web Title: karan johar rocky aur rani ki prem kahani released on amazon prime ott platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.