पहिला सीझन गाजला, आता 'द रॉयल्स २' घेऊन येतायत ईशान-भूमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:35 IST2025-05-28T13:34:04+5:302025-05-28T13:35:04+5:30

पहिला सीझन यशस्वी ठरल्यानंतर आता निर्मात्यांनी 'द रॉयल्स २'ची अधिकृत घोषणा केली आहे.

Ishaan Khatter Bhumi Pednekar's Netflix Show The Royals Season 2 Confirmed | पहिला सीझन गाजला, आता 'द रॉयल्स २' घेऊन येतायत ईशान-भूमी!

पहिला सीझन गाजला, आता 'द रॉयल्स २' घेऊन येतायत ईशान-भूमी!

The Royals Season 2 Confirmed: बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या 'द रॉयल्स' (The Royals ) या वेब सिरीजला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलंय. राजघराण्यातील रोमांचक ट्विस्ट आणि ईशान-भूमीच्या जबरदस्त अभिनयामुळे ही वेब सिरीज मोठ्या प्रमाणात गाजली. त्यामुळे सिरीजचा पुढील भाग पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली होती. आता दुसऱ्या सीझनच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पहिला सीझन यशस्वी ठरल्यानंतर आता निर्मात्यांनी 'द रॉयल्स २'ची अधिकृत घोषणा केली आहे.

नेटफ्लिक्सनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर 'द रॉयल्स २' येत असल्याची माहिती दिली आहे. पण, नेमकीत तारीख सांगण्यात आलेली नाही. 'द रॉयल्स २' आणखी मोठ्या आणि भव्य रुपात येणार आहे. यात कथानकात नवीन पात्रे,  अधिक थरार असणार असल्याचं निर्मात्यांनी सांगितलंय. या घोषणेनंतर 'द रॉयल्स'च्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

'द रॉयल्स' या पहिल्या सीझनमध्ये भूमी पेडणेकर, ईशान खट्टर यांच्यासह झीनत अमान, साक्षी तन्वर, चंकी पांडे, उदित अरोरा, नोरा फतेही अशी स्टारकास्ट पाहायला मिळाली. या वेब सिरीजला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. ही सिरीज राजे आणि महाराजांच्या कथेवर आधारित आहे. ज्यामध्ये त्यांचा वारसा आणि वर्चस्व दाखवण्यात आलं आहे.


ईशान खट्टर हा एका राजघराण्याचा वारसदार अविराज सिंगच्या आणि भूमी पेडणेकर ही सोफिया शेखर या तरुण आणि हुशार उद्योजिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाली. दोन भिन्न जगातील हे दोघे सुरुवातील भेटतात, तेव्हा त्यांच्यात वैचारिक मतभेद दिसून येतात. पण, मत्याच संघर्षातून ते हळूहळू एकमेंकाच्या प्रेमात पडतात. या सिरीजमध्ये हलकेफुलके विनोद आणि रोमान्स यांचा सुरेख मेळ पाहायला मिळाला आहे. संपूर्ण सीरिजमध्ये ट्विस्ट आणि टर्न आहेत. आता नव्या सीझनमध्ये कथा कशी पुढे जाईल आणि कोणते ट्विस्ट्स पाहायला मिळतील, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Web Title: Ishaan Khatter Bhumi Pednekar's Netflix Show The Royals Season 2 Confirmed