हृतिकचा 'फायटर' ते सारा अली खानचा देशभक्तीपर सिनेमा येतोय ओटीटीवर; कधी, कुठे वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 07:53 PM2024-03-20T19:53:06+5:302024-03-20T19:53:48+5:30

विशेषकरुन हा वीकेंड खूपच स्पेशल असणार आहे. चला बघुया या वीकेंडला रिलीज होणारे चित्रपट कोणते आहेत.

Hrithik Roshan s Fighter to Sara Ali Khan s patriotic movie is releasing on OTT read when and where | हृतिकचा 'फायटर' ते सारा अली खानचा देशभक्तीपर सिनेमा येतोय ओटीटीवर; कधी, कुठे वाचा सविस्तर

हृतिकचा 'फायटर' ते सारा अली खानचा देशभक्तीपर सिनेमा येतोय ओटीटीवर; कधी, कुठे वाचा सविस्तर

पुढील आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे. यंदाची होळी घरबसल्या खूपच खास असणार आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फायटर' (Fighter) ते सारा अली खानचा 'ए वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेषकरुन हा वीकेंड खूपच स्पेशल असणार आहे. चला बघुया या वीकेंडला रिलीज होणारे चित्रपट कोणते आहेत.

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा बहुप्रतिक्षित 'फायटर' सिनेमा २१ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. घरबसल्या नेटफ्लिक्सवर तुम्ही हा सिनेमा बघू शकणार आहात. एअर फोर्स युनिफॉर्ममध्ये दोघांचा सुपर अभिनय या सिनेमात पाहता येणार आहे. 

करण जोहर निर्मित सारा अली खानचा 'ए वतन मेरे वतन' सध्या चर्चेत आहे. हा सिनेमाही उद्या म्हणजेच 21 मार्च रोजी रिलीज होतोय. अमेझॉन प्राईमवर सिनेमा पाहता येणार आहे. कनन अय्यरने सिनेमा दिग्दर्शित केलाय. यामध्ये  सारा अली खानसोबतच इम्रान हाश्मी, सचिन खेडेकर यांचीही भूमिका आहे. उषा मेहता या धाडसी तरुणीच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे.

साऊथच्या चाहत्यांसाठी खूशखबर म्हणजे रजनीकांत यांचा बहुचर्चित 'लाल सलाम' सिनेमा २२ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. नेटफ्लिक्सवर सिनेमा पाहता येईल. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने सिनेमा दिग्दर्शित केलाय. मात्र यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे.

गेल्या वर्षीचा सर्वाच चर्चेतला सिनेमा, ऑस्करमध्ये डंका गाजवणारा हॉलिवूड सिनेमा 'ओपनहायमर'ही ओटीटीवर येत आहे. उद्याच २१ मार्च रोजी जियो सिनेमावर सिनेमा पाहता येईल. सिनेमाने यावर्षी तब्बल ७ ऑस्कर पटकावले. सिलियन मर्फीने सिनेमात मुख्य भूमिका साकारली ज्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कारही मिळाला.

हंसल मेहता यांचा 'लुटेरे' हा सिनेमाही तुम्ही बघू शकता. २२ मार्च रोजी हॉटस्टारवर सिनेमा रिलीज होतोय. जय मेहता यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे.ो

Web Title: Hrithik Roshan s Fighter to Sara Ali Khan s patriotic movie is releasing on OTT read when and where

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.