आदिती रावविषयी शर्मिनने केली खोचक कमेंट, आता नेटकरी करतायेत आलमजेबला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:23 PM2024-05-27T12:23:22+5:302024-05-27T12:24:15+5:30

Sharmin segal: 'एवढे डायलॉग्स तर ही हिरामंडीमध्ये पण बोलली नसेल' असं म्हणत नेटकऱ्यांनी शर्मिनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

heeramandi-sharmin-segal-called-aditi-rao-hydari-a-good-school-girl-for-punctuality-fans-slammed | आदिती रावविषयी शर्मिनने केली खोचक कमेंट, आता नेटकरी करतायेत आलमजेबला ट्रोल

आदिती रावविषयी शर्मिनने केली खोचक कमेंट, आता नेटकरी करतायेत आलमजेबला ट्रोल

संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही वेबसीरिज सध्या चांगलीच गाजत आहे. या सीरिजच्या माध्यमातून भन्साळींनी ओटीटीवर पदार्पण केलं. मल्टीस्टारर असलेल्या या सीरिजमध्ये शर्मिन सेगलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सीरिजनंतर शर्मिन प्रचंड चर्चेत आली आहे. अनेकांनी तिचा अभिनय पाहून तिला ट्रोल केलं होतं. यामध्येच आता ती आणखी एका कारणामुळे ट्रोल झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर शर्मिनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने अभिनेत्री अदिती राव हैदरी हिच्याविषयी खोचक भाष्य केल्यामुळे नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

सध्या सोशल मीडियावर शर्मिनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मुलाखतीमध्ये ती सहभागी झाली होती. या मुलाखतीमध्ये तिच्यासोबत 'हिरामंडी' फेम संजिदा खान आणि ऋचा चड्ढा या दोघी दिसून येत आहेत.  मुलाखत सुरु असतांना शर्मिने अदितीची खिल्ली उडवली. ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत. इतकंच नाही तर हिरामंडीमधील तिच्या अभिनयावरुनही तिला सुनावलं आहे.

आदितीविषयी नेमकं काय म्हणाली शर्मिन?

आदिती म्हणजे एक शाळेतली एक आदर्श विद्यार्थिनी आहे. म्हणजे शिक्षकांनी सांगितलं की, तुमचा होमवर्क तुम्हाला या ठराविक वेळेपर्यंत सबमीट करायचा आहे. तर, आदिती बरोबर तेच काम करणार. नमूद केलेल्या मर्यादेच्या बाहेर ती एक शब्द सुद्धा जास्तीचा लिहिणार नाही. त्यामुळे आदिती तुमच्यासाठी तशी आहे. पण, तिच्या हिशोबानुसार, बाकी सगळे लेट आहेत. तिच काय ते फक्त सगळं वेळात करते, असं शर्मिन म्हणाली.

काय म्हणाले नेटकरी?

शर्मिनचं हे वाक्य ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ''अरे देवा, ही किती द्वेष करतीये. अदितीसोबत स्वत:ची तुला करायला लागलीये पण हिला तर साधा अभिनय सुद्धा येत नाही'', असं एका युजरने म्हटलं आहे. तर, "एवढे डायलॉग्स तर तू संपूर्ण हिरामंडीमध्येही बोलले नसतील", असं अन्य एका युजरने म्हटलं आहे. "ही एवढी का ओरडून बोलतीये, अभिनयासोबतच हिला जरा बोलण्याची पद्धतही शिकवायला हवी", "आपल्यापेक्षा सिनिअर कलाकारांचा मान राखणंही गरजेचं असतं. हिला पाहून सोनम कपूरची आठवण येतीये मला", असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला चांगलं ट्रोल केलं आहे.

Web Title: heeramandi-sharmin-segal-called-aditi-rao-hydari-a-good-school-girl-for-punctuality-fans-slammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.