कपिलसोबतचा वाद पब्लिसिटी स्टंट होता? सुनील ग्रोवरचा खुलासा; कॉमेडी शोमध्ये कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:13 PM2024-03-27T16:13:50+5:302024-03-27T16:16:26+5:30

'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या प्रमोशनवेळी सुनील ग्रोवरने 7 वर्षांपूर्वी कपिलसोबत झालेल्या भांडणाला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे.

Comedian Sunil Grover said arguement with kapil sharma was part of publicity stunt | कपिलसोबतचा वाद पब्लिसिटी स्टंट होता? सुनील ग्रोवरचा खुलासा; कॉमेडी शोमध्ये कमबॅक

कपिलसोबतचा वाद पब्लिसिटी स्टंट होता? सुनील ग्रोवरचा खुलासा; कॉमेडी शोमध्ये कमबॅक

कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि सुनील ग्रोवर (Sunil Grover) ही कॉमेडीतली बेस्ट जोडी. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात झालेला वाद गाजला होता. आता दोघंही मतभेद विसरुन पुन्हा एकदा सोबत आले आहेत. कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'  (The Great Indian Kapil Show) ओटीटीवर रिलीज होतोय. यामध्ये सुनील ग्रोवरने कमबॅक केले आहे. तसंच सुनीलने नुकतंच त्यांच्यात 7 वर्षांपूर्वी झालेल्या वादा मागचं सत्य उलगडलं आहे.

'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या प्रमोशनवेळी सुनील ग्रोवरने 7 वर्षांपूर्वी कपिलसोबत झालेल्या भांडणाला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. सुनील म्हणाला, "आम्ही फ्लाईटमध्ये बसलो होतो आणि कळलं की नेटफ्लिक्स भारतात येणार आहे, तर मग काहीतरी धाँसू पब्लिसिटी स्टंट झाला पाहिजे. आता ही गोष्ट सुनीलने अर्थात मस्करीत बोलल्याचं स्पष्ट कळतं. तसंच सुनीलला आता त्या जुन्या वादावर काही भाष्य करण्याची इच्छा नाही."

सुनीलचं म्हणणं पुढे नेत कपिल शर्मा म्हणाला, "सुनील सुद्धा अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होता मीही होतो म्हणूनच आम्ही सोबत आलो नव्हतो. पण आता तो परत आल्याने आम्हाला खूप आनंद होतोय." सुनील ग्रोवरनेही कपिल शर्मामध्ये परत आल्याचा उत्साह व्यक्त केला आहे. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये सुनील ग्रोवरसोबतच कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर, कीकू शारदा सुद्धा आहेत. तर अर्चना पूरन सिंह जज आहे. शोचा प्रोमो आला असून सुनील ग्रोवर पुन्हा एकदा गुत्थीच्या भूमिकेत धमाल करताना दिसणार आहे. शोमध्ये पहिले पाहुणे रणबीर कपूर आणि नीतू कपूर आहेत. 30 मार्च पासून नेटफ्लिक्सवर शो पाहता येणार आहे.

Web Title: Comedian Sunil Grover said arguement with kapil sharma was part of publicity stunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.