"मी तिची चाहती आहे", भूमी पेडणेकरला सई ताम्हणकरचं कौतुक, म्हणते- हंटर पाहताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 10:53 IST2024-02-26T10:51:58+5:302024-02-26T10:53:12+5:30

सईने 'भक्षक' सिनेमात भूमी पेडणेकरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमातील सईच्या कामाचं भूमीने कौतुक केलं आहे.

bhumi pednekar praises sai tamhankar for her work in bhakshak said i am fan of her | "मी तिची चाहती आहे", भूमी पेडणेकरला सई ताम्हणकरचं कौतुक, म्हणते- हंटर पाहताना...

"मी तिची चाहती आहे", भूमी पेडणेकरला सई ताम्हणकरचं कौतुक, म्हणते- हंटर पाहताना...

भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. भूमी सध्या तिच्या 'भक्षक' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात भूमी मुख्य भूमिकेत असून मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरही 'भक्षक'मध्ये झळकली आहे. सईने या सिनेमात भूमी पेडणेकरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमातील सईच्या कामाचं भूमीने कौतुक केलं आहे. भूमीने नुकतंच इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. यामध्ये तिला सई ताम्हणकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना भूमीने सईचं कौतुक करत एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ती म्हणाली, "मी नेहमीच सईच्या कामाची चाहती राहिलेली आहे. मला आठवतंय हंटर पाहताना मी तिची भूमिका खूप एन्जॉय केली. जेव्हा पुलकितने मला सांगितलं की ती भक्षकमध्ये असणार आहे. मी तिच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक होते. तिची भूमिका ती खूप चांगल्याप्रकारे साकारते. भक्षक सिनेमातील तिचा एक सीन मला खूप आवडला होता. तिचे डोळे खूप बोलके आहेत. त्या क्षणी माझ्या डोळ्यातूनही पाणी आलं."

दरम्यान, 'भक्षक' हा सिनेमा ९ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या सिनेमात भूमीने वैशाली सिंह ही महिला पत्रकाराची भूमिका साकारली आहे. तर सई ताम्हणकर जसमीत गौर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. पुलकितने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून सध्या हा सिनेमा ट्रेंडिंगमध्ये आहे. 

Web Title: bhumi pednekar praises sai tamhankar for her work in bhakshak said i am fan of her